धूम-पान : आयुर्वेदिक औषधी युक्त धुराचे सेवन ....
आजकाल "धूम्र "पान हे एक व्यसन झाले असून तंबाखू सारख्या अति विषारी पदार्थांचा धूर सेवन करायची एक भयानक पद्धत जगभरात रूढ झाली आहे ....
अशा विनाशाकडे नेणाऱ्या व्यसनापेक्षा आयुर्वेदात सांगितलेले " धूम " पान जास्त आरोग्यदायी आहे . त्याबद्दल माहिती पाहूया ...
गळा आणि छाती हे शरीरातील कफाचे स्थान आहे . आपण जो श्वासोच्छवास करत असतो त्या वेळी बाहेरील हवेचा शरीराशी थेट संपर्क येत असतो . हा वायू रुक्ष असतो . त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून घसा , श्वासनलिका , आणि फुफ्फुसे यात कफ उत्पन्न होऊन तो अवयवांना ओलसर ठेवत असतो .
मात्र चुकीच्या आहार विहारामुळे कफाची उत्पत्ती वाढून त्याचा शरीराला त्रास होऊ लागतो . हा त्रास होऊ नये म्हणून धूम पान करावे असे आयुर्वेद शास्त्र सांगते .
अ. मृदू धुम पान :
शरीराला बळ देणारे धुमपान म्हणजे मृदू अथवा सौम्य धूम पान होय . अगरू , गुगुळ , नागरमोथा , दगडफूल , वाळा , जेष्ठमध , केशर , उडीद, राळ , तूप, हाडातील मज्जा ,प्राण्यांची चरबी हे सर्व घटक समप्रमाणात घेऊन ते निखाऱ्यावर टाकावेत आणि त्याचा धूर सेवन करावा ...
या धुराच्या सेवनाने रुक्ष झालेल्या नळ्याना ताकद मिळते
आ. मध्यम धूम पान :
लाख , कमळ दांडा, नीलकमल , वड , उंबर, पिंपळ , लोध्र , खडीसाखर , सोन्याचा अतिशय पातळ पत्रा , पद्मक , रक्तचंदन...
या धुराच्या सेवनाने वाढलेला कफ आणि कोरडा खोकला कमी होतो ....
इ. तीक्ष्ण धूम पान .
मालकांगोनी , हळद, दशमूळ , मनशील, लाख , त्रिफळा ....
या धुराच्या सेवनाने श्वास नळ्यात साचलेला सर्व मळ निघून जातो
उ. खोकल्यासाठी धुमपान :
जेष्ठमध , ओवा, जीवन्ति, अगरू, इंगुदी , एरंडमूळ , वेखंड , हिंग , भूर्जपत्र , तूप यांचा धूर सेवन करून वर खडीसाखर घातलेले दुध प्यावे ...
ऊ. दम्यासाठी धुमपान :
हळदीची पाने , एरंडमूळ, मनुका , मनशील , देवदार, जटामांसी , हरताळयुक्त तूप यांच्या धुराचे सेवन करावे ....
धूम वर्ती बनवण्याची पद्धत ...
१. चार सेंटीमीटर ते १२ सेंटीमीटर लांबीची गवताची मध्यम जाड अशी कडी घेऊन ती पाण्यात चोवीस तास भिजत ठेवावी .
२. नन्तर ती पाण्यातून बाहेर काढून वर वर्णन केलेले जे धुमपान करायचे आहे त्या पदार्थांचा ओलसर वाटून गोळा करावा आणि त्याचे गवताच्या काडीवर मध्ये जाड आणि दोन्ही बाजूंनी पातळ आवरण द्यावे .
३. एक आवरण वाळले कि दुसरे अशी एकूण पाच आवरणे द्यावीत . अशी ही आवरणे पायाच्या अंगठ्याएवढी जाड होतात .
४. या धूम वर्तीवर तूप लावून धूमयंत्रात बसवून तिचा धूर सेवन करावा .
धुमपानाची नळी वेगवेगळ्या आकाराची असते ...
तिचा आकार जोकर च्या टोपीसारखा शंकू असतो .
******* धुमपानाची पद्धत *******
१. सरळ बसावे . तोंड उघडे ठेऊन आळीपाळीने एकेका नाकपुडीने धूर आत ओढावा . त्यावेळी विरुद्ध नाकपुडी बंद ठेवावी . प्रत्येक नाकपुडीने तीनदा धूर आत खेचून तो तोंडाने सोडून द्यावा ...
२. नाकाने धूर सोडल्यास दृष्टी आणि डोळे यांना भयानक इजा पोहोचते .
३. आजार नाक आणि डोके अशा ठिकाणी असतील तर धूर नाकानेच घ्यावा .
घसा, श्वासनलिका किंवा श्वासमार्गात आजार असतील तर धूर तोंडाने घेऊन तोंडानेच सोडावा ..
धुमपानाने बरे होणारे आजार ..
अकाली केस गळणे / पिकणे , लाळ गळणे , सर्दी / जुनाट सर्दी , अति प्रमाणात शिंका , डोकेदुखी , डोके जड होणे, अर्धशिशी , कानदुखी , नाक/ कान / डोळे यातून स्त्राव येणे , दात दुखी , खोकला , श्वास , उचकी, उलटी , बुद्धी भ्रंश , आदी ....
धूम पान कुणी करू नये ....
१. १८ वर्षाखालील मुले आणि गर्भवती स्त्रिया .
२. डोक्यास मार लागलेली व्यक्ती , मोतीबिंदू , पोटफुगी , मधुमेह , रक्त स्त्राव झालेली व्यक्ती ,
३. घसा कोरडा झाला असेल तर .
४. कृष् आणि दुर्बल व्यक्तींनी
५. जागरण ,अतिश्रम, दुःख करणाऱ्या व्यक्तींनी .
६. दुध , तूप , मध , मेण, मासे , दही , मद्य आणि विष सेवन केलेल्यांनी
( टीप : शास्त्रोक्त धूम पान अतिशय विशिष्ट असून पारंगत वैद्यांच्या मार्गदर्शना खालीच करावे .)

No comments:
Post a Comment