आयुर्वेदाची आरोग्याला मिळालेली देणगी ...
वरा चूर्णम् .... अर्थात गुणकारी त्रिफळा .....

हिरडा , आवळा आणि बेहडा ही तीन फळे एकत्र केली कि जे चूर्ण तयार होते ते म्हणजे त्रिफळा ...
हिरडा , आवळा आणि बेहडा ही तिन्ही दिव्य म्हणावी इतकी उत्तम औषधे आहेत . आणि त्यांच्या मिश्रणातून तयार झालेल्या त्रिफळाचे गुणधर्म पाहीले तर प्रत्येक घरात आणि आजीबाईच्या बटव्यात हे औषध नक्कीच हवे हे सगळ्यांच्या लक्षात येईल .
१. त्रिफळा हा सौम्य विरेचक आहे .
पोट साफ करून मोठ्या आतड्यांना बळ देण्याचे काम त्रिफळा करते त्यामुळे वात - पित्त - कफ या तिन्ही दोषांना सम अवस्थेत ठेऊन शरीराचे आरोग्य राखले जाते .
२. त्रिफळा ही नेत्रासाठी उत्तम आहे .
अ. डोळ्यांच्या जवळ जवळ सर्व विकारांवर त्रिफळा चूर्ण , त्रिफळा गुगुळ ही औषधे नेहमीच्या चिकित्सेसोबत घेतली तर लवकर गुण येतो.
आ. डोळे आले असतील त्रिफळा काढ्याने डोळे धुतले तर डोळ्याचा चिकटा कमी होतो .
इ. त्रिफळा जाळून तयार होणारी मशेरी वस्त्रगाळ करून ती गायीच्या तुपात खलून डोळ्यात काजळा सारखी वापरावी .
३. जखमेसाठी त्रिफळा सारखे उत्तम औषध नाही .
अ. वारंवार केसतुड उठून त्रास होत असेल तर त्रिफळा गुगुळ उत्तम उपयोगी आहे . अशावेळी होणाऱ्या जखमा त्रिफळा लवकर भरून काढते .
आ. मधुमेहासारख्या आजारात बऱ्याचदा न् भरणाऱ्या जखमा होताना दिसतात . अशा वेळी त्या जखमा धुण्यासाठी त्रिफळा काढा वापरावा आणि पोटात त्रिफळा चूर्ण , त्रिफळा गुगुळ, सूक्ष्म त्रिफळा अशी औषधे घ्यावीत .
४. चरबी कमी करून वजन कमी करणारी त्रिफळा ....
अ. जे शरीराची फारशी हालचाल करत नाहीत नेहमी बसून असतात , सुखवस्तू व्यक्ती , अशांमध्ये शरीरात चरबीचे थर वाढू लागतात . घाम आला तरी घामाला नकोसा असा आंबट , कुबट वास येऊ लागतो . चालल्यावर दम लागतो . अशी लक्षणे असतील तर इतर औषधांसोबत त्रिफळा वापरली तर चरबी झडायला वेगाने सुरवात होते . वजन देखील कमी व्हायला सुरवात होते .
५. आम्लपित्त या आजारात रात्री झोपताना काही दिवस त्रिफळा चूर्ण सेवन केले कि पोटातील अतिरिक्त आणि दुषित झालेले पित्त शौचावाटे बाहेर पडायला मदत होते आणि आजाराची तीव्रता कमी होते .
६. त्रिफळा स्मृती आणि बुद्धी वर्धक आहे .देशी गायीच्या तूप सोबत तिचे सेवन केले असता हा बुद्धी वर्धक गुण लवकर दिसतो .
७. त्रिफळा शरीरात साचलेली विषे बाहेर काढते . त्यामुळे शरीराचे शुद्धीकरण करण्यासाठी प्राथमिक स्तरावर ती उत्तम आहे .
( टीप : त्रिफळा कितीही उत्तम असली तरी तिचे अपेक्षित गुणधर्म इतर औषधांच्या सोबत असले तर योग्य पद्धतीने दिसतात . त्यामुळे अशा वेळी पारंगत वैद्यांचा सल्ला घ्यावा .)

No comments:
Post a Comment