मी मराठा

पेटवुन टाकिल आख्खा महाराष्ट्र मराठीच्या जयघोषानं... मी युवा महाराष्ट्राचा... माझी भाषा.....माझा अभिमान...

Thursday, November 6, 2014

पपई : पोर्तुगीजांनी भारताला दिलेली रसाळ भेट ...

पपई : पोर्तुगीजांनी भारताला दिलेली रसाळ भेट ...


पपई हे बाजारात सहज उपलब्ध होणारे , रसाळ , मधुर , पचनाला मदत करणारे फळ आहे .... तीचे मूळ अमेरिकेत आहे .. पोर्तुगीजांनी ती भारतात आणली ...

आजकाल बाजारात सीडलेस म्हणजे कमी किंवा अजिबात बिया नसलेल्या पपया मिळतात ... त्यांची चव पण फारशी मधुर नसते ... पांचट लागतात ...त्या अजिबात खाऊ नयेत ....

ज्या पपईच्या बिया पिकल्यावर सुंदर काळ्या जेली सारख्या दिसतात आणि रुजल्यावर चांगले झाड येते अशीच पपई खावी ....

पपईचा उल्लेख कोणत्याही आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये आढळत नाही ...मात्र ती खाल्ल्यावर आलेल्या अनुभवांवर असाच अभ्यास करावा लागतो ....

पपईचे उपयोग :
१. पपई गर्भारपणात खाऊ नये असे सांगितले जाते .... खरं तर कच्च्या पपईतून मिळणारा १ भाग चिक २५० भाग मांस पचवायला मदत करतो .... त्यामुळे कच्च्या पपईचे सेवन हमखास गर्भपाताला कारणीभूत ठरू शकते ....
मात्र पिकलेल्या पपई मध्ये हा चिक अत्यंत कमी असतो .... ज्याने गर्भपात होईलच असे नाही ....त्यामुळे गर्भधारणा झाली आहे हे माहित नसताना चुकून पिकलेली पपई खाल्ली तर खूप घाबरून जायचे कारण नाही ....

२. पपई हि त्वचेसाठी उत्तम असून , ज्यांच्या चेहऱ्यावर जुन्या मुरुमांचे डाग आहेत / चेहरा काळवंडला आहे अशांनी चांगली पिकलेली पपई बारीक कुस्करून ती फक्त दहा मिनिटे चेहऱ्यास लावून ठेवावी ....आणि चेहरा धुवून टाकावा ....
हा प्रयोग दोन तीन दिवसातून एकदा असा करावा ....

३. मांस पचनासाठी पपई खूप उपयुक्त असल्याने ज्यांना मांसाहार केल्यावर त्रास होतो अशांनी गरगरीत पिकलेल्या पपईच्या चारपाच फोडी अवश्य खाव्यात ...

४. असाच उपयोग ज्यांना दुध पचत त्यांनीही करावा ... कच्च्या पपईवर चिरे मारून चिक काढावा ... तो वाळवून ठेवावा आणि दुध पिल्यावर अगदी कणभर पावडर (पाव चिमुट ) खावी ...

No comments: