मी मराठा

पेटवुन टाकिल आख्खा महाराष्ट्र मराठीच्या जयघोषानं... मी युवा महाराष्ट्राचा... माझी भाषा.....माझा अभिमान...

Thursday, November 6, 2014

डाळिंब : आबालवृद्धाना सहज सात्म्य होईल असेल अमृतफळ .....

डाळिंब : आबालवृद्धाना सहज सात्म्य होईल असेल अमृतफळ .....


बाजारात या काळात डाळिंब सहज मिळते ... डाळिंबाचा एक फळ यापेक्षा एक औषध म्हणून सर्वसामान्य आयुष्यात खूप उपयोग होतो ....
डाळिंबी च्या अनेक जाती उपलब्ध असून त्यातली पांढर्या दाण्यांची मस्कती डाळिंबे उत्तम आहेत ..आफ्रिका ,काबुल आणि इराण मधली डाळिंबे उत्कृष्ट या वर्गात बसतात ....

डाळींबची सालआणि दाणे दोन्ही उपयुक्त आहेत ....

१. डाळिंब उत्तम पित्तशामक असून कोणत्याही प्रकारचा पित्ताचा त्रास डाळिंब खाल्ल्यावर कमी होतो ...

२. आजारपणात तोंडाची चव गेली असेल तर डाळिंब अवश्य खावे ...

३. बर्याचदा गर्भवती स्त्रियांना उलट्या होतात ,पाणी सुद्धा पचत नाही अशावेळी आहार म्हणून फक्त डाळिंब रस द्यावा किंवा सोबत सफरचंद साल काढून खायला द्यावे ... उत्तम फरक दिसतो ...गर्भवतीने काही दिवस काहीही खाल्ले नाही आणि फक्त डाळिंब / सफरचंद खाल्ले तरी तिला त्रास होत नाही ....इतके हे सुंदर औषध आहे ...

४.हृदयाचे स्नायू दुखून दुखून छातीत वेदना होत असतील तर डाळिंब दाण्याचा रस आणि खडीसाखर खावी वेदना थांबतात ... हृदयाला बळ देण्यासाठी कमकुवत हृदय असणार्या लोकांनी डाळिंब नियमित खावे ...

५. लहान मुलांचा खोकला थांबत नसेल तर डाळिंब रस , मध आणि साखर मिसळून वरचेवर द्यावे ... खोकला कमी होत जातो ...मोठ्या माणसांनी खोकला थांबायला नुसती डाळिंब साल तोंडात धरून तिचा रस गिळला तरी पुरेसे आहे ....

६. अन्न पचन झाल्यावर सारखे पातळ संडासला होत असेल तर डाळिंब नियमित खाण्यात ठेवावे जुलाब होत नाहीत ...

७. घाणेरड्या वासामुळे किंवा कत्तलखान्याच्या दर्शनाने मनाला किळस येऊन अन्नाबद्दल तिटकारा वाटत असेल तर चांगले पिकलेले ताजे डाळिंब कापून त्याचा वास घ्यावा आणि ते खावे मनाची स्थिती चांगली होते ....

८. अजीर्ण नेहमीच होते अशांनी डाळिंब रस नियमित सेवन करावा ...

९. गांधीलमाशी , मधमाशी , ढेकुण किंवा विषारी कीटक चावल्यास जिथे पुरळ उठेल तिथे डाळिंब रस चोळावा ...त्रास लगेच कमी होतो ....

१०. जास्त बोलून किंवा ओरडून आवाज बसला तर रोज चांगले पिकलेले एक डाळिंब खावे ...

११. डाळिंब मेंदूला बळ देणारे असून जास्त बौद्धिक कामे करणार्यांनी ते नियमित सेवन करावे ...

No comments: