बदाम : बुद्धी तल्लख करणारा सुकामेवा ....
परवा एका मित्राच्या घरी गेलो होतो ... त्याच्या अंगणात एक डेरेदार , हिरवेगार आणि छानपैकी उंच झालेले एक झाड होते ....
मला तो कौतुकाने सांगत होता " हे बदामाच एवढसं रोपटं आमच्या बाबांनी आणलं होतं पंधरा वर्षापूर्वी..... आता केवढं झालंय बघ !!! ढीगभर फळे येतात आणि कितीतरी खाली पडून खराब होतात... "
खरं तर बदामाची झाडे काश्मीर सोडलं तर इतर भारतात आढळत नाहीत आणि आपण अंगणात लावतो तो खोटा बदाम आहे हे मला सांगायला जीवावर आलं होतं ...
.पश्चिम आशिया , युरोप , पंजाब आणि काश्मीर या थंड आणि रुक्ष प्रदेशात बदामाची लागवड केली जाते ... आणि त्याच वातावरणात तो उत्तम येतो ....
बदामाचे पुष्कळ उपयोग आहेत ...
१. बदाम बी बुद्धी साठी उपयुक्त असून रात्री गायीच्या एक कप कोमट दुधात दोन बदाम भिजत घालावेत आणि सकाळी ७ वाजता अनशापोटी दुधासह त्यांचे सेवन करावे ... शारीरिक क्षमता आणि बुद्धी दोन्ही वाढायला मदत होते ....
२. बदामची पेस्ट तयार करून ती मुलतानी मातीत मिसळून लेप करून चेहऱ्यावर लावल्याने चेहरा तेजस्वी दिसतो... चेहऱ्याची त्वचा काळवंडली असेल तर हा साधा घरगुती उपाय आहे ... या लेपात गुलाबपाणी आणि दुध वापरावे ...
३. अंगाची खाज कमी येत नसेल तर बदाम तेलाने मालिश करावी ... लहान मुलांनाही मालिश साठी बदाम तेल उत्तम आहे ....
४. केसांसाठी देखील बदाम तेल उत्तम असून डोक्याला मालिश केली कि केशवृद्धी आणि बलवृद्धी असे अद्भुत गुणधर्म त्यात दिसतात ....
५. वाताच्या आजारात बदाम तेल थेट पोटात घ्यायची योजना पण करता येते पण त्यासाठी रुग्णाचा अभ्यास करता येतो ....
६. हिवाळ्यात बदाम पाक खायला सुरवात करा .... वर्षभराची शक्ती मिळायला मदत मिळते ...
७. बदामाचे तेल योनीकंडू या त्रासदायक आजारात अत्यंत उपयुक्त आहे ...

No comments:
Post a Comment