मी मराठा

पेटवुन टाकिल आख्खा महाराष्ट्र मराठीच्या जयघोषानं... मी युवा महाराष्ट्राचा... माझी भाषा.....माझा अभिमान...

Thursday, November 6, 2014

पारिजातक : स्वर्गातून भगवान श्रीकृष्णाने पृथ्वीवर आणलेली संजीवनी ....

पारिजातक : स्वर्गातून भगवान श्रीकृष्णाने पृथ्वीवर आणलेली संजीवनी ....


पारिजातक हा मध्यम वाढणारा वृक्ष असून हिंदू धर्मात अनेक कथा दंतकथा या वृक्षाशी संबंधित आहेत ... समुद्र मंथनातून एक रत्न म्हणून पारिजातक वृक्ष प्राप्त झाला असा संदर्भ तर सर्वत्र आढळतो ... म्हणजे नक्कीच या वृक्षाचे महत्व असणार...

हलक्या पांढऱ्या रंगाच्या फुलांचा घमघमीत सुगंधाचा सडा तर या वृक्षाचे खास वैशिष्ट्य आहे .... प्राजक्ताच्या फुलांचा दांडा पिवळसर लाल असा असतो .... नैसर्गिक रंग म्हणून मिठाईला रंग येण्यासाठी या फुलांच्या वाळलेल्या दांड्याचे चूर्ण सर्रास वापरले जाते ....

पारिजातकाच्या फुलांच्या दांड्याच्या देखण्या लालभडक रंगाची उपमा स्त्रियांच्या अधर ओष्ठाला देतात ...( प्राजक्त )

तापाच्या वेगवेगळ्या अवस्थेत पारिजातक योजना करून उत्तम वापरता येतो ....
तापाला आयुर्वेदात आठ सर्वात भयंकर आणि प्राणघातक अशा आजारात गणले आहे ....(अष्टमहागद )...या आजारावर वापरता येतो म्हणून हे एक महौषध आहे असे आम्हाला वाटते ...

पारिजातकाचे काही औषधी गुणधर्म पाहू ....
१) पारिजातकाची पाने आलटून पालटून सातत्याने येणाऱ्या तापावर उत्तम औषध आहे ... ओली पाने ठेचून त्यात गूळ घालून तयार केलेल्या गोळ्या घेतल्या कि त्या दिवशी ताप येत नाही ...

२) परीजातकाची पाने तेल लावून गरम करून दुखर्या सांध्यावर बांधावीत ... वेदना कमी होतात ...

३) पारिजातकाच्या बिया कुटून त्यांचा लेप नुकतेच केस गळून पडलेल्या टकलावर उत्तम फायदा होतो ( वैद्यकीय निरीक्षण आवश्यक )

४) पारीजातकच्या सालीचे चूर्ण खोकला , दमा या आजारात देतात ... रक्तविकार असतील तर रक्तातील दोष कमी करण्यासाठी हे चूर्ण वापरता येते ...

५) जुनाट ताप असेल तर सालीचे आणि पानाचे चूर्ण एकत्र करून घेतल्यास फायदा दिसतो ...

६) दारू पिऊन यकृत खराब झाले असतील तर पारिजातकाच्या सालीचे चूर्ण आशादायी आहे ...

७) तापात घाम येत नसेल तर पानांचा गरम गरम काढा घेतल्यास घाम यायला मदत होते ....

No comments: