कोहळा : शरीराला तेज, बळ आणि शीतलता देणारी नवसंजीवनी .....

कोहळा म्हटलं कि आमच्या बालपणी गावी दर दिवाळीच्या अमावास्येला फडक्यात बांधून दारावर बांधायला आणलेले फळ आठवते ... दर वर्षी बदलून ते नवीन बांधले जायचे ....त्यावेळी हे फळ कडू आणि विषारीच असणार अशी आमची धारणा झाली होती ...
जन्म झाल्यावर अपत्ये जगत नसतील तर कोहळ्याचा कापून बळी दिला जात असे ... अशी मुले जगली तर त्यांनी आयुष्यभर कोहळा खायला प्रतिबंध असे ....
आयुर्वेद महाविद्यालयात आम्हाला या कोहळ्याचा साखरेच्या पाकातला " कुष्मांड अवलेह " तयार केला आणि रुग्णांसाठी वापरला त्यावेळी या अद्वितीय अमृततुल्य फळाची महती पटली ...
कोहळ्याचे फळ हे अंडाकृती दाट पांढरी लव असणारे आणि मूलतः हिरवा रंग असणारे आहे ....मध्यम पिकलेला कोहळा चवीला साधारण गोड आणि थंड गुणधर्माचा असतो ...
१. शरीरात उष्णता वाढली कि शरीर नाकावाटे किंवा गुदद्वारावाटे रक्तस्त्राव करून हि उष्णता बाहेर टाकते ...कोहळ्याचा चार चमचे रस साखर घालून घेतला कि शरीरातली उष्णता भरपूर कमी होते ... आणि रक्तस्त्राव थांबतो ...
२.वेडसरपणा , भ्रमिष्ट , विचित्र बडबड अशी लक्षणे असतील तर कोहळ्याचा रस खडीसाखर मिसळून साधारण तीन आठवडे सकाळ संध्याकाळ घ्यावा ....लक्षणे वेगाने कमी होतात ...
३. कफातून रक्त पडत असेल तर कोहळ्याचा रस साखरेतून घ्यावा ...
४. कोहळेपाक बाजारात विकत मिळतो त्याचे काही गुणधर्म पाहूया ...
अ) जुनाट ताप असेल आणि त्याने शक्ती क्षीण झाली तर कोहळेपाक दोन दोन चमचे दिवसातून दोनदा खावा ...
आ) आम्लपित्ताचा त्रास असेलतर हा पाक जेवणाआधी खावा ...
इ) बाळंतपणानंतर होणाऱ्या आजारांत कोहळेपाक अमृताचे काम करतो ...
ई) रात्री झोप येत नसेल तर कोहळापाक झोपताना खावा ...
फ) डोकेदुखी जास्त असेल कोहळापाक नियमित खावा ...
५) पांडुरोग (अनिमिया ) या आजारात कोहळ्याचे सेवन उत्तम ...
६) वीर्यशुद्धी आणि वीर्यवृद्धी साठी कोहळ्यापासून तयार केलेला कुष्मांड अवलेह सेवन करावा ...
७) फिट्स येणाऱ्या रुग्णांमध्ये दिवसातून दोनदा कोहळ्याचे १० ग्राम वजनाचे ताजे तुकडे खाऊन दुध प्यायला द्यावे ... हा उपाय दीर्घकाळ करावा ...

No comments:
Post a Comment