शेंगदाणे : सर्वांचे आवडते चविष्ट आणि औषधोपयोगी तेल-बी ...

प्रत्येक स्वयंपाक घरात हमखास आढळतात ते म्हणजे शेंगदाणे ... कच्चे , भाजलेले , कुटून ठेवलेले आणि कधीतरी तोंडी लावावे म्हणून खारवलेले ... भारतीय गृहिणीचं आणि शेंगदाण्याच एक घट्ट नातं आहे ....
पण आज आपण हा शेंगदाणा औषधीय दृष्टीने पाहणार आहोत ....
आजवर औषध म्हणून शेंगदाणा वापरला गेला नसला तरी काही प्रयोगातून त्याचे जबरदस्त औषधी गुण आम्हास सापडले ....
१. लहान मुलांसाठी लोणी हे अत्यंत पौष्टिक मानले जाते ...मात्र गरिबांना जर लोणी उपलब्ध झाले नाही तर त्यांनी भाजलेल्या शेंगदाण्याचा गोळा त्या ऐवजी द्यावा ...तो लोण्यापेक्षा जास्त फायदेशीर दिसतो ..
२. लहान मुलांचे वजन कमी असेल तर नित्य गरम करून कोमट केलेल्या शेंगदाणा तेलाने सर्वांगास मसाज करावा ...
३. खूप दिवस अंथरुणावर आजारी पडलेल्या व्यक्तीने आजार बर झाल्यावर जो अशक्तपणा राहतो त्यासाठी शेंगदाणे भाजून कुटून त्यात तेवढीच खडीसाखर घालून लाडू बनवून ते खावेत ...
४. शारीरिक शक्ती वाढण्यासाठी काही जन बदाम खातात ... बदामापेक्षा जास्त ताकत शेंगदाणे खाल्ल्याने येते ...
५. वजन कमी असलेल्या व्यक्तींनी शेंगदाण्याचे लाडू नित्यनेमाने सेवन केल्यास वजन वाढण्यास खूप खूप मदत होते ...
६. मुडदूस झालेल्या बालकास लिंबूएवढा शेंगदाण्याचा लाडू दहा दिवस दिला तर त्याला खूप फायदा दिसतो . महिना भर नित्य दिला तर आजाराची तीव्रता पूर्ण कमी होते ...
७. मुळव्याध या भयानक आजारात रुग्णाला संडासला साफ होत नाही बर्याचदा संडासचे खडे होतात आणि त्रास वाढत राहतो ... अशा वेळी ४०-५० भाजलेले शेंगदाणे दोन्ही वेळच्या जेवणानंतर खावेत आनीवरून घोटभर पाणी प्यावे .. त्याने संडासला साफ होऊन मुळव्याध चा त्रास कमी होतो ....आणि असे सारखे सेवन केल्यास मुळव्याध पूर्ण बरी होते ...
८. अंगावर खरखरीत , बरीच खाज येते आणि कशानेही बरा होत नाही असा खरुज सारखा त्वचारोग असेल तर कच्चा शेंगदाणा पाण्यात उगाळून त्याने रोग झालेली जागा चोळावी ..
९. जिममध्ये नव्याने जाण्यास सुरवात केलेल्या मुलांनी भाजलेले शेंगदाणे किंवा शेंगदाण्याचे लाडू नित्य खावेत . त्यामुळे वजन आणि शरीराचा आकार वाढण्यास खूप मदत होते .
१०. शेंगदाणे हे जीवनसत्व ब चे उत्तम स्त्रोत आहेत ... नियमित शेंगदाणे सेवन करणाऱ्या व्यक्तींमध्ये ब जीवनसत्वाची कमतरता आढळत नाही ...
११ . शेगदाणे हे तारुण्य टिकवून ठेवण्यात खूप मदत करतात ...
विशेष सूचना : तीव्र आम्लपित्ताचा त्रास , मुतखडा किंवा मूत्रमार्गाचे विकार , थायरोईड ग्रंथीचा आजार असणार्या व्यक्तींनी शेंगदाण्याचे सेवन टाळावे

No comments:
Post a Comment