सफरचंद : आरोग्याला नवसंजीवनी देणारे फळ ...

रोज एक सफरचंद खा आणि डॉक्टरांना दूर ठेवा ... अशा अर्थाची एक सुप्रसिद्ध म्हण इंग्रजीत आहे ...
सफरचंद हे अतिशय रुचकर , गोड , मधुर सुगंध असणारे आणि भरपूर गर असणारे फळ आहे ...
अशा या दिव्य फळाचे सेवन करताना एक गोष्ट ध्यानात ठेवावी ....
बाजारात दिसणारी मोठी ,गरगरीत आणि चकचकीत अशी सफरचंद विकत घेऊ नयेत ....
लहान आकाराची उत्तम सुगंध येणारी देशी सफरचंद औषध म्हणून आरोग्यास हितकर ....
सफरचंद आरोग्याला कसे उपयुक्त आहे ते पाहूया ...
१. अपचन आणि अम्लपित्त : अन्न पचत नाही , अन्न खाल्ल्यावर घशाशी येते , तोंडाला पाणी सुटते , ढेकर येतात , आंबट उलटी होते अशा आजारात सफरचंद नियमित खाल्ल्याने उत्तम फायदा होतो .
२. भूक कमी लागतं असेल किंवा अन्न जात नसेल अशा वेळी दिवसातून एक ते दोन सफरचंद नियमित खाल्याने शरीराला आवश्यक सर्व घटक मिळून भूक प्राकृत होते ...
३. गर्भावस्थेत स्त्रियांना काहीही खाल्ले तर उलट्या होतात पाणीदेखील पचत नाही , अशक्तपणा वाढत आहे अशा अवस्थेत नुसती सफरचंद आहार म्हणून दिली तरी वरील लक्षणे नष्ट होतात ..
४. आमवात : हा अत्यंत दारूण आणि त्रासदायक विकार असून साधे हलवता येत नाहीत , शरीर जड झाले आहे , प्रत्येक सांध्यातून कळा मारत आहेत अशा वेळी सफरचंदाचे नित्य सेवन रामबाण इलाज आहे ...
५. जुनाट दारू प्यायची सवय मोडायची असेल तर रुग्णाला नियमित सफरचंद खायला द्यावीत ...
६. ताप येऊन भयानक थंडी जाणवत असेल , बरीच पांघरुणे घेऊनही थंडी कमी होत नसेल तेव्हा तातडीने दोन लहान सफरचंद खायला द्यावीत.... त्वरित फायदा दिसतो ...
७. तोंड येऊन अन्न खाणे अवघड झाले असेल , घशातून गिळताना त्रास होत असेल तर सफरचंदचा साखर न घातलेला रस प्यावा ...
८. खूप दिवसाचा जुनाट आम्लपित्ताचा त्रास ग्रहणी सारख्या आजारात बदलून पोटात वेदना होत असतील तर सफरचंदाचे सेवन हे उत्तम औषध आहे ...
९. जुलाब होऊन अशक्तपणा आलं असेल तर नुसते सफरचंदाचे सेवा अमृततुल्य आहे ....

No comments:
Post a Comment