मी मराठा

पेटवुन टाकिल आख्खा महाराष्ट्र मराठीच्या जयघोषानं... मी युवा महाराष्ट्राचा... माझी भाषा.....माझा अभिमान...

Thursday, November 6, 2014

नारळ : आरोग्याचा कल्पतरू ...

नारळ : आरोग्याचा कल्पतरू ...


नारळाला कल्पतरू म्हणतात ते खरंच फारच चिंतनीय आहे ....
ओला नारळ , सुका नारळ (खोबरे ), नारळाचे पाणी , नारळाचे दुध , नारळाचे तेल आणि नारळाचे तूप , नारळाची करवंटी, नारळाच्या झाडाची मुळे आणि नारळाची शेंडी इतके सर्वच्या सर्व जिन्नस औषधोपयोगी आहेत ....

ओले खोबरे :
१. ओले खोबरे स्वभावाने अतिशय शीतल गुणधर्माचे आहे ..शरीरात आग होत आहे असे वाटत असेल तर ओले खोबरे खावे दाह शांत होतो ...

२. घशात खवखव होऊन खोकला येत असेल तर ओले खोबरे बारीक केलेल्या खडीसाखरेसोबत खावे ...

३. खोकल्यातून रक्त पडत असेल तर ओले खोबरे आणि थंड पाण्यात तासभर भिजवलेली काळे मनुके खावेत ..

४. पाणी पिऊनही तहान भागत नसेल तर ओले खोबरे चवून खावे ...

५. रोज दोन इंच ओले खोबरे चावून खाल्ले तर शारीरिक ताकद वाढते ..

६. व्यायाम न करणाऱ्या सडपातळ व्यक्तींनी रोज ओले खोबरे खाल्ले तर उत्तम पद्धतीने वजन वाढलेले दिसते ...

ओले खोबरे जास्त खाऊ नये कारण ते पचायला जड आहे शिवाय जास्त मात्रेत खाल्ले तर पोट फुगते ..त्यामुळे पचेल इतकेच आणि बेतानेच खावे ...

No comments: