मी मराठा

पेटवुन टाकिल आख्खा महाराष्ट्र मराठीच्या जयघोषानं... मी युवा महाराष्ट्राचा... माझी भाषा.....माझा अभिमान...

Thursday, November 6, 2014

केसांसाठी जास्वंद तेल : बाप्पाच्या आवडत्या फुलाचा एक सुंदर योग ....

केसांसाठी जास्वंद तेल : बाप्पाच्या आवडत्या फुलाचा एक सुंदर योग ....

आज आपण याच जास्वंदापासून केसांचे तेल कसे तयार करायचे ते पाहूया ...

जास्वंदीचे तेल शीतल गुणधर्माचे असून ते साधारण चिकट आणि बुळबुळीत भासते ...केस काळे करण्यासाठी, मऊ करण्यासाठी आणि गळती थांबवण्यासाठी तर त्याचा उत्तम उपयोग होऊ शकतो ..

आज आपण हे तेल करायची साधी सोप्पी आणि शास्त्रोक्त पद्धत पाहूया ...

१. जास्वंदीची फुले : पाच पाकळ्यांची साधी फुले असतील तर १०० फुले आणि भरगच्च लाल जास्वंद असेल तर २५ फुले ...
२. ओल्या माक्याचा रस २५० मिली
३. वाळवलेले आवळे १० नग
४. वडाच्या कोवळ्या पारंब्याची टोके साधारण एक वाटी
४. खोबरेल तेल ५०० ग्राम .

कृती :
प्रथम आवळे कुटून भरड करून घ्यावेत ते २ लिटर पाण्यात रात्रभर भिजत ठेवावेत .( हेच पाणी आवळ्यासहित वापरावे फेकून देऊ नये ...)
जास्वंदीच्या पाकळ्या बारीक कुस्करून घ्याव्यात . वडाच्या पारंब्या पण ठेचून बारीक कराव्यात ..
सर्व मिश्रण एकत्र करावे ....नंतर या मिश्रणात माक्याचा रस आणि खोबरेल तेल मिसळून मिश्रण लोखंडी कढई मध्ये शिजवायला ठेवावे ...

थोड्या वेळाने मिश्रण उकळू लागते तेव्हा अधून मधून ढवळत राहावे ...
बराच वेळ उष्णता दिल्यावर जास्वंदाच्या पाकळ्यांचा रंग मिश्रणात उतरू लागतो आणि त्या रंगहीन होतात ....
मिश्रणाला चांगला रंग येत राहतो आणि पाणी उडून जाऊन तेल शिल्लक राहू लागते ...
तेलात थोडेच पाणी शिल्लक आहे हे लक्षात आल्यावर मिश्रण उतरून व्यवस्थित गाळून घ्यावे ...
आणि परत चुलीवर ठेवावे ...

नंतर मात्र फार काळजी घ्यावी लागते ...अग्नी मंद ठेवावा लागतो ... मिश्रणात कापसाची वात बुडवून ती आगीवर धरावी ...तडतड करत जळाली तर पाणी शिल्लक आहे असे समजावे ... वात निर्वेध जळाली कि तेल तयार झाले असे समजावे ....मात्र तेल जळू देऊ नये ....

तेलाला मंद सुगंध येतो ....चिकट, बुळबुळीत आणि रंगाने गडद असे जास्वंद तेल केसांसाठी अमृत आहे ...

आणि बाजारात मिळणाऱ्या कोणत्याही तेलापेक्षा याचा गुण उत्तम येतो....

No comments: