च्यवनप्राश :

समज , गैरसमज आणि वास्तव ....
( आमच्या वाचकांच्या खास आग्रहास्तव पुन:प्रकाशित)
च्यवनप्राश हा शब्द ऐकला कि टीवीवर दिसणाऱ्या ढीगभर जाहिराती त्यात वर्णन केलेले कल्पनातीत फायदे, सर्वांना उपयुक्त (?) हेच समाजावर ठसवण्याचा एक दुष्ट व्यावसायिक हेतू दिसतो ...
खरंच च्यवनप्राश हा खरंच आबालवृद्धांना सर्वांना उपयुक्त ठरू शकतो का ???
त्याचा हा अल्प अभ्यास ...
च्यवनप्राश हा रसायन कल्प आहे आणि आयुर्वेदाच्या अनेक ग्रंथात थोडाफार फरक करून या कल्पाचे वर्णन आहेच आहे . वुद्ध आणि बलहीन झालेल्या च्यवन ऋषींना तारुण्य प्राप्तीसाठी "अश्विनी कुमार" या देवांच्या वैद्यांनी हा कल्प करून दिला आणि त्यानंतर ते तरुण, देखणे, सुकुमार झाले आणि स्त्रियांमध्ये प्रसिद्ध झाले ....
असे या च्यवनप्राश करण्यामागील प्रयोजनाचे वर्णन ग्रंथात आढळते .
च्यवनप्राश तयार करण्याची पद्धत :
आवळा हा च्यवनप्राशचा मुख्य घटक असून हिवाळ्यात येणारे चांगले गरगरीत आवळे शिजवून त्यांचा गर काढला जातो . हा गर तुपात चांगला भाजून त्याचा मावा करतात . त्यात दशमुल , अष्टवर्गादी द्रव्यांचा काढा घालून साखरेच्या पाकात तो घट्ट केला जातो. थंड झाल्यावर चातुर्जात , मध आदी घटक क्रमाने आणि योग्य प्रमाणात घालून च्यवनप्राश केला जातो .
च्यवनप्राश चे स्वरूप :
ग्रंथोक्त पद्धतीने केलेल्या च्यवनप्राशची चव अत्यंत विचित्र काहीशी कडवट असते . पण त्याचा गुण लवकर आणि अपेक्षित असा दिसतो .
ताज्या कल्पाचा रंग डार्क ब्राऊन असतो कालांतराने तो काळा होत जातो . एक प्रसन्न मनाला आवडेल असा सुगंध या कल्पाला आहे . केरळ मधील बहुतेक कंपन्या या पद्धतीने च्यवनप्राश करतात. आणि तो किमतीला पण जास्त महाग असतो. बाजारात मोठ्या प्रमाणात च्यवनप्राश विकणाऱ्या कंपन्या. लोकांना ती आवडावी म्हणून कंपन्या त्यात जास्त साखर घालतात . पण त्याने मूळ कल्पाचे गुणधर्म खूप कमी होतात .
च्यवनप्राश आणि सुवर्णकल्प / सुवर्ण भस्म :
काही कंपन्या त्यात सुवर्णभस्म किंवा मकरध्वजसारखे उच्च प्रतीचे सुवर्णकल्प वापरतात . पण च्यवनप्राश ज्या घटकापासून तयार केला जातो तो आवळा चवीला आंबट आहे आणि आंबट पदार्थ आणि धातूंची भस्मे अथवा सुवर्णकल्प एकत्र खात नाहीत त्याने धातूंच्या भस्मांचे गुणधर्म बदलतात , काही वेळा ते विषारी सुद्धा होऊ शकतात .....
कोणत्याही आयुर्वेदिक ग्रंथात च्यवनप्राशमध्ये धातूंची भस्मे घालावी असा उल्लेख आलेला नाही .
च्यवनप्राश कुणासाठी योग्य ?
हा कल्प आयुर्वेदात रसायनकल्प मानला जातो .
माझ्या अभ्यासाप्रमाणे खालील काही व्यक्तींमध्ये तो योग्य पद्धतीने वापरता येतो .
अ) दीर्घकालीन आजारातून उठलेले रुग्ण
आ) वयोवृद्ध , अशक्त वृद्ध व्यक्ती
इ) प्रमाणापेक्षा वजन कमी असणारे
ई ) रोगप्रतिकारक क्षमता कमी असलेले
उ) जीर्ण सर्दी खोकल्याच्या त्रासाने ग्रासलेले
ऊ ) तारुण्य टिकवून ठेवण्यासाठी
च्यवन प्राश कसा सेवन करावा ???
अशा लोकांची पचनशक्ती चांगली आहे याची खात्री करून सकाळी ७ वाजता रसायन काळी एक चमचा च्यवनप्राश अनाशापोटी तसच घ्यावा गरज वाटली तरच मधासोबत घ्यावा .
च्यवनप्राश दुधातून चुकुनही घेऊ नये कारण त्याचा रस आंबट असून दुध आणि च्यवनप्राश एकत्र घेतल्याने विरुद्ध अन्न सेवन होऊन गरविष निर्माण होऊ शकते . जे शरीरास हानिकारक आहे .
सर्दी-खोकला अशा व्याधीत सोबत सितोपलादी चूर्ण वगेरे घेऊ शकतो. (वैद्यांच्या सल्ल्यानुसार ) अशी त्यानंतर अर्धा तस काही खाऊ नये ....
नंतरची दिनचर्या नेहमीप्रमाणे चालू करावी ....
च्यवनप्राश तसा पचायला जड आहे . त्यामुळे आम्लपित्त असेल किंवा पचनशक्ती कमी असेल तर हा कल्प खाल्ल्याने त्रास होऊ शकतो . वर सांगितलेल्या पद्धतीने तो घेतला तरच १००% लाभ दिसतो .
च्यवनप्राश खाल्ल्याने भूक प्रचंड वाढते . त्यामुळे हल्लीच्या काळात योग्य पद्धतीने तयार केलेला एक चमचा च्यवनप्राश खाल्ल्यावर सहन होणार नाही इतकी कडकडून भूक लागते आणि शिवाय भरपूर अन्न एकाच वेळी खायची रुग्णाची क्षमता वाढते , असे आमच्या पाहण्यात आले आहे ...
टीवी वरच्या जाहिरातीत चक्क दोन-दोन (??) चमचे च्यवनप्राश दिवसातून दोनदा तेही दुधातून (?) खायचा भयानक सल्ला दिला जातो ....
त्याचे शास्त्र अजून आम्हास कळले नाही ....
च्यवनप्राश चा मुख्य घटक आवळा हा आधुनिक शास्त्राप्रमाणे anti - oxident आहे. त्यात विटामिन सी खूप असते . म्हणजे तो शरीराची झीज जास्त प्रमाणात होऊ देत नाही ... शिवाय त्याच्या नित्य सेवनाने शरीरातील पेशींचे आयुष्य वाढते नी पर्यायाने त्याचे सेवन करणाऱ्या व्यक्तीचेही आयुष्य वाढते ....
च्यवन प्राश मध्ये आवळ्याचे हे गुण कित्येक पटींनी वाढलेले दिसतात शिवाय अल्प मात्रेत खूप लवकर आणि अद्भूत गुणधर्म हा कल्प दाखवतो ....

No comments:
Post a Comment