मी मराठा

पेटवुन टाकिल आख्खा महाराष्ट्र मराठीच्या जयघोषानं... मी युवा महाराष्ट्राचा... माझी भाषा.....माझा अभिमान...

Thursday, November 6, 2014

आयुर्वेदाच्या दृष्टीने मुक्ता अर्थात "मोती "

आयुर्वेदाच्या दृष्टीने मुक्ता अर्थात "मोती "


मोती औषधात कसे वापरावेत हे पाहूया ....
जे वाचून तुम्हाला कळेल कि एका-एका औषधावर आयुर्वेदात किती प्रचंड संशोधन झाले आहे .....

परीक्षा :उत्तम मोती हा चमकदार, वजनदार , तुळतुळीत, अच्छिद्र आणि सुडौल असावा ... दातांनी चावला तर दगडासारखा कठीण असावा ....

स्वरूप : औषधासाठी वापरताना मोती लिंबूच्या रसात किंवा गरम पाण्याने धुवून दगडाच्या खलबत्त्यात बारीक कुटून घ्यावा ...त्याची वस्त्रगाळ पूड अथवा पिष्टी ही औषधात वापरतात ..

मोती वात- पित्त - कफ या तिन्ही दोषांची शांती करतो ....

खोकला, दमा, पाठदुखी आणि क्षय या रोगात तो विशेषत्वाने वापरला जातो .....

प्रमाणाबाहेर घाम येणे , घामाला घाणेरडा वास येणे , यात उत्तम उपयुक्त ...

नेत्र विकारात मधातून डोळ्यात सोडावा...
मात्र त्याचे हे कार्य लेखन करणारे असल्याने वैद्यांचा सल्ला घ्यावा ...

वेडसरपणा , फिट येणे , पित्तामुळे होणारी डोकेदुखी , तसेच निद्रानाश यासाठी उपयुक्त ...

भूक न लागणे, यकृताचे विकार , रक्ती मुळव्याध , ग्रहणी अशा व्याधीत उपयुक्त .....

कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत असल्याने हाडांच्या दुखण्यात किंवा हाड मोडणे यात उपयुक्त ....

दृष्टी कमी होत असल्यास उपयुक्त ...

शरीराचा अंतर्दाह कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ....

सप्तम धातुंपर्यंत जाऊन कार्य करायची ताकद असल्याने स्त्रियांच्या प्रदररोगात आणि पुरुषांमध्ये शुक्र धातूची दुष्टी कमी करण्यासाठी उपयुक्त ....

कल्प : मुक्ता पिष्टी , मौक्तिक युक्त कामदुधा रस , वसंत कुसुमाकर रस आदी ...

खरंच मोती त्याच्या स्वरुपाप्रमाणेच कार्य पण देखेणेच करतो ...

No comments: