मी मराठा

पेटवुन टाकिल आख्खा महाराष्ट्र मराठीच्या जयघोषानं... मी युवा महाराष्ट्राचा... माझी भाषा.....माझा अभिमान...

Thursday, November 6, 2014

चायनीज अन्न (?)पदार्थ : विषारी चीनी ड्रैगनची भारतीय मनाला पडलेली भयानक भुरळ ....(उत्तरार्ध )

चायनीज अन्न (?)पदार्थ : विषारी चीनी ड्रैगनची भारतीय मनाला पडलेली भयानक भुरळ ....(उत्तरार्ध )


आता हा उत्तरार्ध मांडायच्या आधी एक गोष्ट सांगावीशी वाटते कि चायनीज आहार पद्धतीचा पहिला लेख इतका तुफान गाजला कि आमच्या watsapp वर अक्षरशः मेसेज आणिअभिनंदनाचा पाऊस पडला ....त्याबद्दल माझ्या तमाम वाचकांचे आभार ....

आता हे दुसरे पुष्प ....समर्थ चरणी ...

चायनीज पदार्थात जे टोफू वापरतात ते म्हणजे सोयाबीन दुधापासून तयार केलेले पनीर होय .... सोयाबिन estrogen हे होर्मोन वाढवते... पुरुषांनी सोयाबीनचे प्रदीर्घ केल्यास त्यांच्या छातीची स्त्रियांप्रमाणे स्तनवृद्धी होऊ शकते ...ज्याला gynecomastia म्हटले जाते ... स्त्रियांनी सेवन केल्यास गर्भाशय आणि मुख्यतः स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता कित्येक पटींनी वाढते ....

शेजवान राईस बनवण्यासाठी जो लाल रंग वापरला जातो तो हातावर घेऊन चोळून पहा... मेंदिप्रमाणे त्याचा रंग हाताला चिकटून राहतो ...
हाच रंग पोटात जाताना आतल्या अवयवांना देखील चिकटतो ..
जे अत्यंत हानिकारक आहे ..

काही चायनीज पदार्थ करताना कडकडीत उकळलेल्या तेलात पदार्थ तळावे लागतात ... हे तेल पुन्हा पुन्हा वापरल्याने तयार केलेले पदार्थ पचायला खूप जड होतात ... अम्लपित्ताचा त्रास असणार्यांना चायनीज अन्न म्हणजे विषाचा घोट घेतल्याचा प्रकार आहे .... अशा व्यक्तींनी सातत्याने असा आहार घेतल्यास ग्रहणी हा पचन शक्तीशी संबंधित व्याधी होऊ शकतो ....

हेच तेल तळून झाल्यावर पुन्हा नवीन पदार्थ बनवायला वापरले जाते ... ज्यामुळे ते खाल्ल्यावर पचन शक्तीवर मोठा आघात होऊन खाल्लेले अन्न पदार्थ पचवायला भयानक जड जाते ...
सातत्याने चायनीज खाणारे लोक पचनशक्तीशी संबंधित विकारांनी त्रस्त असतात ..

चायनीज आहार रुक्ष असून तेलाचा विचित्र वापर त्या आहाराचे मूल्य अजूनच कमी करतो ...
असा आहार पचवणे म्हणजे जीवाशी खेळण्याचा अघोरी प्रकार होय ...

भारतासारख्या दैवी भूमीतून हा आसुरी आहार पूर्णपणे हद्दपार करूया ....

No comments: