तांबूलसेवन : अर्थात विडा खाणे...

हिंदू संस्कृतीत तांबूलभक्षण हे आरोग्यकारक, पवित्र आणि प्रशस्त मानले गेले आहे .
आयुर्वेदानुसार ताम्बुलासंबंधी माहिती पाहूया ....
तांबूल म्हणजे विडा . नागवेलीच्या पानांमध्ये सुगंधी , तिखट , तुरट द्रव्ये घालून त्याची गुंडाळी करून विडा खाणे म्हणजे तांबूल सेवन . बराच वेळ संभाषण , वक्तृत्व, गाणे , उन्हात फिरणे यामुळे तोंडात कोरड पाडून श्वासाला दुर्गंधी येते त्यावेळी त्यावेळी तांबूल सेवन करावे .
तांबूलसेवनातील द्रव्ये :
सुपारी, कापूर, कस्तुरी , लवंग, जायफळ ,कंकोळ , मिरी , चुना ही द्रव्ये बारीक करून क्रमाक्रमाने घालावीत .
तांबूलसेवन केव्हा करावे :
सकाळी उठल्यावर ,स्नान झाल्यावर ,जेवणानंतर, युद्धाच्या वेळी ,विद्वान किंवा राजा यांच्या समवेत , संभोगाआधी , संभोगसमयी , संभोगानन्तर आदी ....
( याचा अर्थ असा नाही कि दिवसभर सारखा विडा खावा , खायचा असेल तर वरील वेळी खावा ...)
तांबूलाचे गुण :
कडू , तिखट , मधुर , तीक्ष्ण , उष्ण , खारट, मुखाला रुची आणणारा , कामवर्धक, वात-कफ आणि तोंडाची दुर्गंधी नष्ट करणारा , श्रमपरिहार करणारा , रक्त आणि पित्त वाढवणारा अशा पद्धतीने विडा बहुगुणी आहे .....
पान कसे खावे :
देठ काढून , शिरा काढून , शेंडा तोडून पान घ्यावे .
सकाळच्या वेळी सुपारी जास्त घालावी .
दुपारी काथ जास्त घालावा .
रात्री चुना जास्त घालावा .
प्रथम येणारा रस विषासारखा आहे तो गिळू नये .
दुसऱ्यावेळी येणारा रस मुत्रविकार निर्माण करतो तोही गिळू नये .
तिसऱ्यावेळी व पुढे येणारा रस अमृतासारखा आहे तो गिळावा.....
विडा कोणी खाऊ नये ?
ज्यांना रक्तस्रावसारखे व्याधी आहेत , डोळ्यांचे विकार असणारे , क्षय रोगी , दमा रोगी , जुलाब होत असतील तर , अंगाची आग होत असेल तर , दारू पिणाऱ्या व्यक्तींनी विडा खाऊ नये
जास्त विडा खाल्ला तर देह, दृष्टी, केस, दात , पचनशक्ती , कान , शरीराची कांती , बळ यांचा नाश होतो ....
विड्याचे फायदे :
विडा हा कामोत्तेजक , रुचीकारक , तोंड स्वच्छ करणारा असा आहे .
योग्य पद्धतीने विडा सेवन केला तर कंठरोग नष्ट होतात .
जुनाट खोकला , गळ्याचे रोग , कफरोग यावर विडा उपयुक्त आहे .
हृदय , वाणी , स्वर यांना बळ प्राप्त करून देणारा आहे .
आजकाल बाजारात अनेक प्रकारचे तयार विडे मिळतात . त्यामध्ये घातलेल्या घटक द्र्व्यानुसार त्याचे गुणधर्म बदलत जातात .
काही मध्ये तंबाखू घातलेला असतो . तंबाखू घातलेला विडा विषसमान आहे . आणि आयुर्वेदात कुठेही त्याचे वर्णन नाही . आणि आपले पूर्वज असे पदार्थ घालून कधीही विडा खात नसत ...

No comments:
Post a Comment