कांदा ....
स्वयंपाक घरातला ओळखीचा सदस्य ....

कांदा म्हटला कि आता त्याचे हल्लीचे दर पाहून तो बिन सोलता ही डोळ्यात सहज पाणी येते ....
अनेक संप्रदायात कांदा आणि लसून हे दोन रजतम वाढवणारे पदार्थ म्हणून वर्ज्य आहेत ....
पण युक्तीने वापर केला तर कांदा अमृतासारखा उपयुक्त आहे ....
या कांद्याचे चिकित्सेच्या दृष्टीकोनातून असंख्य उपयोग आहेत ...
१. कांदा हा उष्ण असून तो वातशामक आणि कफ आणि पित्त यांना वाढवणारा आहे .पचायला जड असून, तीक्ष्ण गंधी आहे . त्याच्या तीक्ष्णगंधी गुणधर्माचा वापर करून बेशुद्ध व्यक्तीला शुद्धीवर आणता येते हे सर्वाना माहित असेलच ...
२. कांद्याचे नियमित सेवन दृष्टीला हितकारक आहे . दृष्टी कमी होत असेल तर कांद्याचा रस +मध यांचे अंजन डोळ्यात घालतात .
३. कांदा कुटून गरम करून त्याचा पोटीस शरीराच्या दुखणाऱ्या भागावर लावला तर वेदना कमी होते .
४. हृदय अशक्त झाले तर , कोरडा खोकला , कष्टाने लघवी होणे अशा विकारात सकाळी सात वाजता पांढऱ्या कांद्याचा रस तीन ते चार चमचे थंड पाण्यातून घेतला तर आराम मिळतो ...
५. शुक्रदुष्टी मध्ये कांदा अमृतासारखा काम करतो ...वीर्य कमी प्रमाणात शरीरात निर्माण होत असेल तर कांद्याचा वापर नियमित असेल वीर्याची मात्रा बरीच वाढते . लैंगिक क्षमता देखील चांगली वाढते .
६. अचानक किंवा मुका मार लागून सूज आली असेल तर कांदा गरम करून त्याचा पोटीस बांधला तर उत्तम फायदा होतो .
७. कांद्याचे नित्यसेवन तारुण्य टिकवून ठेवते .
८. थंडीच्या दिवसात सर्दी खोकला कमी होत नसेल तर चार चमचे कांद्याचा रस आणि एक चमचा मध सेवन करावा .
९. सायटिका , फिट येणे ,संधीवात, रेबीज अशा वातविकारात कांद्याच्या उष्ण गुणधर्माचा चांगला वापर होतो .
सूचना :
अ. औषध म्हणून कांदा वापरायचा असेल तर तो शक्यतो पांढरा कांदा वापरावा .
ब. पित्तप्रकृतीचे लोक आणि मेंदूची दुर्बलता असेल तर कांदा सेवन करू नये . कांदा बाधला तर डाळिंबाच्या रसाचे सेवन करावे .

No comments:
Post a Comment