मी मराठा

पेटवुन टाकिल आख्खा महाराष्ट्र मराठीच्या जयघोषानं... मी युवा महाराष्ट्राचा... माझी भाषा.....माझा अभिमान...

Thursday, November 6, 2014

एरंड स्नेह केसरी :

एरंड स्नेह केसरी :


एरंड म्हटलं कि कुठेही रस्त्याच्या कडेला , रानात बांधावर वाढलेले एरंडाचे गुल्म म्हणावे असे मध्यम पण लहान बांध्याचे आणि मोठ्या पानांचे झाड आठवते ...

एरंडाचे तेल हे पूर्वी हिंदुस्थानातल्या घराघरात आबाल वृद्ध सर्वांसाठी एक सामान्य औषध होते ... मात्र काळाच्या ओघात एरंड तेल वापरणे अत्यंत कमी झाले आहे ....

शुण्ठी सिद्ध एरंड तेल :

एरंडतेल कच्चे वापरू नये . ते गीळगिळित आणि विचित्र गंधाचे असल्याने पोटात घेताना नकोसे होते . यासाठी पुढील विधी करूनच मग ते वापरावे .
एरंड तेल अर्धा किलो असेल तर ६० ग्राम सुंठ पावडर घ्यावी आणि त्या तेलात घालून मग त्यात परत अर्धा लिटर पाणी घालावे ... सर्व मिश्रण एवढे उकळावे कि त्यातील पाणी पूर्ण उडून जाईल आणि फक्त तेल शिल्लक राहील ... काळजी घ्यावी कि तेल जळणार नाही ....
असे तयार तेल बाजारात मिळते .

एरंडाचे तेल आणि त्याचे मूळ (एरंड मूळ ) औषधात मोठ्या प्रमाणात वापरले जाते एरंडाचे काही अद्भुत उपयोग पाहूया .....

१. एरंड हा उत्तम वातशामक आहे . कंबरदुखी , गृध्रसी (सायटिका ), बरगड्यामधील वेदना , हृदयाची वेदना , आमवात , पोटात वायू साचणे , गळ्याला किंवा स्तनाला सूज येणे अशा व्याधीत एरंडाची पाने एरंडाच्याच तेलात गरम करून त्या त्या भागावर बांधावीत किंवानुस्ते एरंड तेल गरम करून चोळावे .

२. एरंडतेलाची वात पेटवून धरलेले काजळ डोळे आले असतील वापरावे , वापरण्यापूर्वी त्यात भीमसेनी कापूर आणि गायीचे तूप घालावे . याने डोळे आल्यावर डोळ्यांची होणारी चरचर आणि अस्वस्थता नाहीशी होते .

३.डोळ्यात बारीक आणि टोचणारी वस्तू गेली असेल एरंडतेलाचे थेंब डोळ्यात टाकावेत . काहीही त्रास न होता ती वस्तू निघते .

४. बद्धकोष्ठ ची तक्रार असणार्या लोकांनी एरंडतेल रात्री झोपताना दोन चमचे घ्यावे . नुसते तेल घेणे त्रासदायक वाटत असेल तर गरम पाणी , दुध किंवा चहाची पावडर घालून उकळलेले गरम पाणी प्यावे .

५. पुरण पोळी सारखे पोटात आध्मान (वायू ) तयार करणारे पदार्थ खाताना बर्याच ठिकाणी काळी आमटी जेवणात असते . हि काळी आमटी तयार करायला लागणाऱ्या काळ्या मसाल्यात एरंडाचे मूळ मुख्य आहे .

६. दमा किंवा जुनाट कोरडा खोकला अशा आजारात एरंडतेल पोट साफ करायला घेतले तर अपान वायूची गती प्राकृत होऊन आजार संपुष्टात येतो ....यात पोटातील कफाचे निस्सरण करण्याचे उत्तम कार्य एरंड करतो ...

७. लघवी साफ होत नसेल आणि मूत्राशय दुखत असेल तर एरंड तेलाचे दोन चमचे सेवन करावे याने लघवी साफ तर होतेच पण वेदना सुद्धा त्वरित थांबतात .

८. एरंड हे वेगवेगळया विषांचा परिणाम नष्ट करणारे अद्भुत औषध आहे . साप चावला असता एरंडाची कोवळी पाने पाण्यात वाटून रुग्णास सेवन करायला लावतात याने उलट्या आणि जुलाब होऊन विष बाहेर पडते . अफू आणि बचनागाची विषबाधा झाली असेल तर हाच प्रयोग करता येतो .

९. काविळीत एरंडाच्या कोवळ्या पानांचा रस काढून तो सेवन करावा . याने कावीळ वेगाने शरीराबाहेर पडते आणि रुग्णास त्वरित फायदा दिसतो .

१०. अंगावर पित्या मुलाच्या पोटात एरंडेल जाऊन त्याच्या पोटाची शुद्धी व्हावी यासाठी आईने एरंडेल घ्यावे .मुलाला जंत आदी त्रास होत नाहीत ...

१२. आमवात : सांध्यांना सूज येऊन तिथे होणार्या भयंकर वेदना यासाठी एरंड अतिशय प्रभावी आहे . " आमवातरुपी गजेन्द्राचा नाश करणारा एरंडस्नेह रुपी सिंह ( केसरी ) एकमेव आहे . " अशा शब्दात एरंडाचे गुणगान आयुर्वेदात केले आहे ....

No comments: