जेष्ठमध :

एकाच वेळी चक्षुष्य ( नेत्र ) , वृष्य (शुक्रधातू ), केश्य (केस ), कंठ्य (घसा ) वर्ण्य (रंग उजळविणारी ), रोपनीय (जखमा भरून काढणारी ) अशी अनेकविध कार्ये करणारी दैवी वनस्पती .....
जेष्ठमध म्हटलं कि डोळ्यासमोर येतात त्या जेष्ठमधाच्या दुकानात मिळणाऱ्या काड्या... खोकल्यात घशाला आराम मिळावा म्हणून हे औषध बरेच लोक वापरट असतात ....
पण जेष्ठमध याच्याही पेक्षा भरपूर आजारात वापरला जातो ....
उत्पत्ती :
मूलतः अरबस्तान, इजिप्त , तुर्कस्तान , इराण , अफगाणिस्तान या भागात जेष्ठमधाचे उत्पन्न घेतले जाते .... सध्या सिंध , पेशावर आणि पंजाब येथे जेष्ठमधाची लागवड व्यापारी तत्वावर केली जाते ....
जेष्ठमधाचे आयुर्वेदिक उपयोग :
१. जेष्ठमध दाह, वेदना आणि सूज यांचा नाश करणारा आहे म्हणून शरीरावर जिथे हि लक्षणे जाणवत असतील तिथे जेष्ठमधाच्या चूर्णाचा पाण्यात कालवून लेप करावा .
२. केस गळणे आणि पिकणे यावर जेष्ठमधाच्या काढ्याने केस धुणे हा उत्तम उपाय आहे . तसेच जेष्ठमध घालून तयार केलेले तेल केसांना लावले तरी हाच फायदा दिसतो .
३. शस्त्राने झालेल्या जखमेवर जेष्ठमध आणि तूप मिसळून पुरचुंडी करून शेकल्याने जखम लवकर भरून येत्ते शिवाय वेदना पण कमी होतात ...
४. tonsil चे ऑपरेशन झाल्यावर वरील मिश्रण जखमेत सारले तर वरील मुद्द्यात सांगितलेले सर्व गुणधर्म अभ्यासाला मिळतात .
५. वातवाहिन्यांना बळ देणारे हे औषध असल्याने जवळ जवळ प्रत्येक वाताच्या आजारात अगदी आमवातात सुद्धा वापरता येते .
६. उलट्या होत असतील तर जेष्ठमधाचे थोडेसे चूर्ण दिले तर फायदा होतो .... जास्त प्रमाणात घेतल्यास जास्त उलट्या होऊ शकतात ....
७. पोट साफ करणाऱ्या औषधात जेष्ठमध वापरले तर जास्त फायदा दिसतो.
८. शरीरात रक्त कमी असेल तर जेष्ठमधाचे नियमित सेवन करावे . याने शरीरातील रक्त तर वाढतेच शिवाय रक्ताची शुद्धी पण साधली जाते .
९. गायक आणि सातत्याने मोठ्याने बोलावे लागणारे लोक यांनी नियमित जेष्ठमधाच्या कांड्या चघळाव्या...
१०. आवाज बसला असेल, खोकला , ताप अशा व्याधीत जेष्ठमधाचा चांगला उपयोग होतो. विशेषतः खोकल्यात जेष्ठमधाने सिद्ध केलेले तूप वापरले तर उत्तम फायदा होतो .
११. जेष्ठमधाचे चूर्ण आणि गरम दुध शुक्रवर्धक आणि शुक्र स्तंभक आहे ... त्याने पौरुषत्व वाढून वाजीकरण साध्य होते ...
१२. उन्हाळ्यात आणि शरद ऋतूत चेहर्याला जे मुलतानी मातीसारखे लेप लावतात त्यात जेष्ठमधाचे चूर्ण टाकल्यास रंग उजळण्यासाठी मदत होते ....
याने त्वचा मऊ आणि रक्तकमलाप्रमाणे देखणी दिसते . चंदनबला लाक्षादी नामक तेलाने शरीराला मालिश केली कि शरीर देखणे दिसते त्यामागचे कारण हे आहेकी त्यात जेष्ठमधाचा वापर केला जातो .
१३. ताप आला असेल आणि शरीराचा दाह होत असेल तर जेष्ठमधाचा चूर्ण लेप उपयोगी आहे ...
१४. डोळे आले असता जेष्ठमधाच्या काढ्याने डोळे धुवावेत .... फार वेगाने त्रास कमी होतो .....
१५. पोटात आग होऊन वेदना होत असतील तर जेष्ठमधाच्या कांड्या चघळत बसल्याने फायदा होतो ....

3 comments:
माझा स्वतःचा अनुभव असा आहे.
दररोज सकाळ संध्याकाळ एक कप दुधात २ चमचे जेष्ठ मध घेतल्यास ८ दिवसात रक्तातील हिमोग्लोबिन वाढते.
मोबाईल 9967912010 व्हाट्स अँप.
Pawder ghetali hoti ka tumhi
नमस्कार खुपच उपयुक्त माहिती सांगितली.जेष्ठमधाचे तेल घरी कसे करायचे वकेस पिकने व मुळापासून गळतात यावर कसे वापरावे हे प्लीज सांगितले तर बरे होईल.°
Post a Comment