मी मराठा

पेटवुन टाकिल आख्खा महाराष्ट्र मराठीच्या जयघोषानं... मी युवा महाराष्ट्राचा... माझी भाषा.....माझा अभिमान...

Thursday, November 6, 2014

जांभूळ पिकल्या झाडाखाली .......

जांभूळ पिकल्या झाडाखाली .......


उन्हाळ्याच्या शेवटी मिळणारे जांभूळ हे रसाळ फळ सर्वांच्या आवडीचे आहे ... थोडेसे तुरट थोडेसे आंबट पण गोड अशा तीन तीन चवींनी बहरणारा जांभूळ वृक्ष अनेक आश्चर्य कारक औषधी गुणांनी युक्त आहे ....

जांभळाचे अनेक प्रकार आहेत . फळांचा आणि वृक्षाचा आकार यावरून हे सगळे प्रकार पडले आहेत ...
जांभळाला संस्कृत मध्ये जंबू म्हणतात ....
याच नावावरून राजजंबू ,क्षुद्रजंबू , काकजंबू , भूमिजंबू, गुलाबजंबू असे अनेक प्रकार ग्रंथांमध्ये सांगितले आहेत .....

यातला गुलाबजंबू हा प्रकार वैशिष्ट्य पूर्ण असून ब्रह्मदेश आणि बांगलादेश येथे त्याची उत्पत्ती होते ...याच्या फळात बी नसते , फळ गोलाकार आणि मोत्यासारख्या रंगाचे असते ....फळाचा वास गुलाबाप्रमाणे असतो ....

राजजंबू हा प्रकार उत्तम असतो... फळ मोठे , गरगरीत आणि गर्द देखण्या रंगाचे असते ....

जांभळाचे उपयोग :
१. जांभूळ कफ आणि पित्त यांचे शमन करणारा आहे... आणि वात वाढवणारा आहे ....

२. जखम होऊन रक्तस्त्राव होत असेल तर जांभळाच्या सालीचे चूर्ण त्यावर पिंजरावे ...त्वचेचा दाह होत असेल हेच चूर्ण गुलाब पाण्यात मिसळून लावावे .

३. तापाची लक्षणे वाढून रुग्ण बडबड करू लागला कि फळांच्या गर तीळ तेलात मिसळून त्याची पट्टी डोक्यावर ठेवावी ... लक्षणे त्वरित कमी होतात ..

४. गुप्तरोगात (उपदंश / फिरंग ) जांभूळाच्या पानाने सिद्ध केलेल्या तेलाचा वापर करावा ...

५. जांभळाच्या बियांमध्ये असणारा मगज चूर्ण करून ,मधुमेहात यकृताचे कार्य बिघडत चालले असेल तर वापरता येते .... शक्यतो दारू पिणाऱ्या आणि मधुमेह असणार्या रुग्णांत जांभूळ बी मगज चूर्ण उत्तम कार्य करते ....

६. भूक लागत नसेल , अजीर्ण , पोटदुखी , ग्रहणी अशा आजारात जांभळाचे सेवन उत्तम उपयुक्त आहे ...

७. गर्भवती अवस्थेत होणार्या उलट्यासाठी जांभळाची कोवळी पाने चावून त्यांचा रस गिळणे हे उत्तम औषध आहे ...

८. रक्तप्रदर , रक्त अतिसार अशा व्याधीत जांभळाची बी चूर्ण करून एक अर्धा चमचा चूर्ण करून तांदळाच्या धुवणासोबत घ्यावे ...

९. बियांचे चूर्ण दुधाबरोबर घेतल्यास मधुमेहावर उत्तम गुणकारी आहे ...लघवीला खूप होत असेल आणि मुत्रगत साखरेचे प्रमाण वाढले असेल तर वरील प्रयोग उत्तम उपयुक्त आहे ...

१०. जांभळाच्या सालीच्या चूर्णाच्या काढ्याच्या गुळण्या दातदुखी , दाढदुखी , आणि घसा दुखत असल्यास कराव्या ...

११. लहान मुलांच्या अतिसारासाठी पानांचा रस आणि बकरीचे दुध द्यावे ....

असा हा जांभूळ वृक्ष अनेक व्याधींसाठी रामबाण उपाय आहे ....

No comments: