लोणचे : भारतीयांच्या चवीचा लाडका स्वाद ....

लोणच्याचा वापर खूप आधीपासून आपल्याकडे चालू आहे ...
ताटात एकतरी लोणच्याची फोड असल्याशिवाय जेवणात रंगत येत नाही ....
कैरी , भोकर , लिंबू , मिरची , माइनमुळा , कच्ची करवंदे , गाजर ... अशा अनेक पदार्थांपासून लोणची तयार करण्यात आपल्याकडच्या सुगरणी अग्रेसर असतात ....
लोणच्या साठी कोणताही पदार्थ घेताना त्याचा स्वाद मुख्यतः लक्षात घेतला जातो ... त्यावर ते लोणचे किती चविष्ट होईल हे अवलंबून असते ...
पूर्वीच्या काळी लोणची तयार लोणच्यासाठी जे पदार्थ वापरले जायचे ते वाफवून त्यात मसाला + पांढरी मोहरी + मीठ + तेल टाकून तीनचार महिने मुरवले जायचे ...पंधरा पंधरा दिवसांनी मिश्रण ढवळले जायचे ...
ज्यामुळे ते आरोग्यासाठी हितकर असे ....लोणची बनवण्याची पद्धत थोड्याफार फरकाने वेगळी असते ...
जैन लोकांची लोणची बनवण्याची पद्धत आदर्श असून ते लोणची मुरण्यासाठी ते लोणचे भरलेल्या काचेच्या बरण्या उन्हात ठेवतात ... ज्यामुळे लोणच्याचा स्वाद अजून चविष्ट व्हायला मदत होते ...आणि ते बरेच टिकाऊ होते ...
आज आपण लोणच्याचा आरोग्यावर काय परिणाम होतो याचा अभ्यास करूया ...
लोणचे खाल्ल्यावर तोंडात जी लाळ सुटते ती पचनास सहाय्य करते ...
तोंडाला चव नसेल तर लोणच्याचा खार अत्यंत उपयुक्त ठरतो ...
लोणच्यात अनेक पाचक पदार्थ एकत्र मुरले असल्याने त्याचा उत्तम फायदा पचनसंस्थेवर होतो .....
हल्लीच्या काळात बाजारात जी लोणची मिळतात ती अशा पद्धतीने तयार करत नाहीत .... त्यांना लोणचे मुरवत बसवायला वेळ नसतो ... मग त्यात एसेटिक एसिड टाकून आंबट चव आणली जाते आणि वेगवेगळे रासायनिक प्रीसर्वेटीव टाकून ते आपल्या पदरात टाकले जाते ....
असे लोणचे खाल्ले तर अम्लपित्त वाढून हाडांची झीज वेगाने व्हायला सुरवात होते ...
खरं तर ज्यांना हाडांची दुखणी आहेत अशांनी कोणतेही लोणचे पूर्ण वर्ज्य करावे ....
कोणतेहा चांगला वैद्य जेवणातून लोणचे वर्ज्य करा असे सांगतो ...
खर तर कोणते लोणचे वर्ज्य करावे हे देखील माहित हवे ...
कैरीच्या लोणच्याने (घरचे असो वा बाजारातले )अम्लपित्त हमखास वाढत असले तर माइनमुळ्याचे लोणचे अम्लपित्त अजिबात वाढत नाही ...
लिंबूचे लोणचे पाचक आहे .... तर कच्च्या करवंदाचे लोणचे पचनास हानी पोचवते ...
भोकराचे लोणचे आरोग्यवर्धक आहे ...

No comments:
Post a Comment