मी मराठा

पेटवुन टाकिल आख्खा महाराष्ट्र मराठीच्या जयघोषानं... मी युवा महाराष्ट्राचा... माझी भाषा.....माझा अभिमान...

Thursday, November 6, 2014

नारळ : आरोग्याचा कल्पतरू ...

नारळ : आरोग्याचा कल्पतरू ...


नारळाचे तेल : नारळाचे तेल अर्थात खोबरेल तेल आपल्याला परिचयाचे आहेच. मात्र केसांना लावण्यापुरतेच..... नारळाचे तेल केरळ सारख्या राज्यात जेवणात नियमित वापरले जाते ... शीत गुणधर्म , मधुर चव यामुळे जेवणाची लज्जत वाढायला फार मदत होते ....

कोकणात आवेल म्हणून नारळाचे दुध उकळून तेल काढतात ते देखील पोटात घेण्यास उत्तम आहे ...

नारळाच्या तेलाचे काही गुणधर्म आणि त्याची चिकित्सेच्या दृशिकोनातून माहिती पाहूया ....

१. निशा तेल : नारळाच्या तेलात हळदीची पावडर घालून निशा तेल तयार करतात... गोवर कांजिण्या झाल्यावर लहान मुलांच्या अंगाची लाही लाही होत असते अशावेळी हलक्या हाताने निशा तेल चोळल्यास अंगाची आग कमी होऊन उष्णता कमी होते ...

२. अंगाची उष्णता वाढून आग आग होत असेल तर नारळाचे दुध उकळून काढलेले तेल साधारण दोन दोन चमचे तेल खडीसाखर मिसळून द्यावे ...

३. थंडीत त्वचा कोरडी पडली असेल तर नारळाचे तेल अंगास चोळावे ....

४. उन्हामुळे अंग काळवंडले असेल तर आहारात खोबर्याचे तेल वापरले तरी फायदा दिसतो ...अशा वेळी तेलाचे अंगास मर्दन केले तरी चालते ....

५. मुठेल म्हणजे खोबरे किसून ते मुठीत दाबून काढलेले तेल शरीरात कोठेही वेदना होत असेल तेथे मसाज साठी वापरावे ....

६. खोबरेल तेल नियमित आहारात वापरात असेल तर कोलेस्टेरॉल चा त्रास होत नाही ... हृदयरोग्यांसाठी खोबर्याच्या तेलाचा आहारात वापर अमृत तुल्य आहे ... अगदी रक्तदाब पण सामान्य राहण्यास मदत होते ...

७. खोबरेल तेलात lauric acid असते जे आपले शरीर monolaurin मध्ये परिवर्तीत करते .... जे शरीरात विषाणूंचा प्रभाव अजिबात वाढू देत नाही ...आणि शरीर निरोगी ठेवण्यास फार मदत करते ...

८. खोबरेल तेल त्वचेसाठी उत्तम असून खोबरेल तेल सेवन करणाऱ्या व्यक्तींची त्वचा तेजस्वी दिसते तसेच त्वचा रोग असणार्या लोकांनी खोबरेल तेल आहारात उपयोगात आणल्यास उत्तम फायदा होतो ..

९. खोबरेल तेल शरीरात अतिरिक्त चरबी वाढू देत नाही ज्यामुळे वजन नियंत्रणात राहायला मदत होते ....

१० . खोबरेल तेल वृद्धत्व येऊ देत नाही ... त्यामुळे आहारात खोबरेल तेल असणारेमान्से सहसा लवकर म्हातारी दिसत नाहीत ...

( विशेष सूचना : बाजारात केसांना लावायला मिळणारी खोबरेल तेले दोन चारवेळा शुद्ध केलेली असतात ... घाण्यातून काढलेले आणि एकदा गाळलेले तेल आहारात आणि केसांना लावायला उपयुक्त आहे )

No comments: