मी मराठा

पेटवुन टाकिल आख्खा महाराष्ट्र मराठीच्या जयघोषानं... मी युवा महाराष्ट्राचा... माझी भाषा.....माझा अभिमान...

Thursday, November 6, 2014

नारळ : आरोग्याचा कल्पतरू ...

नारळ : आरोग्याचा कल्पतरू ...


नारळाचे तूप : 
नारळाचे तूप काढायची पद्धत अतिशय सोप्पी आहे ...
पहिल्यांदा नारळाचे दुध काढून घ्यावे ...हे दुध मातीच्या स्वच्छ भांड्यात थंडगार जागी तोंड बांधून ठेवावे .... सकाळी हे दुध रवीने चांगले ढवळावे .... जे लोणी निघेल त्याचे कढवून तूप करावे .... हे तूप वापरावे ...

१. नारळाचे तूप हे कोणत्याही वातविकारावर उत्तम कार्य करते .. शरीराच्या एखाद्या भागात लचक भरून वेदना होत असतील आणि औषधे घेऊनही काही फरक पडत नसेल तर अशा वेळी एक चमचा नारळाचे तूप दिवसातून दोनदा अनाशा पोटी घ्यावे ... चांगला आराम पडतो ...

२. काही जणांना कॉडलिवर ऑईल मांसाहार म्हणून आवडत नाही अशांनी नारळाचे तूप कॉडलिवर ऑइलच्याऐवजी वापरू शकतो ...

३. वाढीच्या वयात मुलांना रोज एक चमचा नारळाचे तूप एक चमचा खडीसाख्रेसोबत द्यावे ... मुलांची शारीरिक वाढ उत्तम होते ...

४. शरीराची उष्णता वाढून उष्णतेचे विकार वाढत असतील तर नारळाचे तुप नियमित सेवन करावे ...

५. डिंकाच्या लाडूत डिंक तळण्यासाठी जे साधे तूप वापरतो त्याऐवजी नारळाचे तूप वापरले तर लाडू जास्त चांगले होतात ...

No comments: