पिंपळ ( अश्वत्थ ) : आरोग्यदाता बोधिवृक्ष ....

पिंपळ हा आपल्या सर्वांच्या परिचयाचा , शेकडो वर्षे जगणारा आणि देखणा दिसणारा वृक्ष आहे .. बौद्ध पंथीय लोक पिंपळ वृक्ष अतिशय पवित्र मानतात ...
याच कारणाने पिंपळाचे औषधी उपयोग आणि दैवी गुणधर्म एकत्र सांगितलेले आढळतात ....
उदा. पिंपळ हा बुद्धिदाता असल्याने पिंपळाच्या सान्निध्यात विद्याध्ययन करणे लाभदायक असते ...
पिंपळ औषध म्हणूनही उपयुक्त आहे ...त्याचे काही सामान्य उपयोग पाहूया ...
१) पिंपळाची साल कुटून त्याचा काढा करून कोणतीही जखम धुतली कि ती लवकर बरी होते ...किंवा सालीचे चूर्ण जुन्या स्त्रावी जखमेवर टाकले असता फायदा होतो ...
२) जुलाब-उलट्या होत असतील तर सालीचा काढा करून प्यावा ..
३) सारखे गर्भपात होत असतील तर अशा स्त्रीला गर्भधारणा झाल्यावर लगेच फळांचे चूर्ण चालू करतात ज्याने गर्भपात होत नाही ....
४) पुरुषांमध्ये लैंगिक क्षमता वाढावी यासाठी फळ, मूळ, साल आणि कोंब यांनी सिद्ध केलेले दुध नियमित देतात ...
५) मधुमेहात साल आणि फळ यांचा काढा देतात ... ( वैद्यकीय सल्ला आवश्यक )
६) त्वचारोग बरे झाल्यावर अंगावर डाग राहिले तर पिंपळाच्या पानांचे कोवळे कोंब वाटून त्यांचा लेप लावतात ...
७) जी मुले वेड्यासारखी करतात ज्यांना बिलकुल काहीही समजत नाही अशा मुलांना दर रविवारी पिंपळाच्या पानाच्या पत्रावळीत उन उन भात गायीच्या तुपासोबत खाऊ घालावा ....हाच प्रयोग जीभ जड असणार्या मुलांना पण लागू होतो ..( सिध्दवैद्य परंपरा )
८) अपत्य नसलेल्यांनी पिंपळाची सेवा करावी ...( दैवी चिकित्सा )

No comments:
Post a Comment