ब्राह्मी : अर्थात साक्षात बुद्धीची देवता सरस्वती !!!

ब्राह्मी या वनस्पतीबद्दल लोकांना फार कुतूहल असते . ब्राह्मी म्हणून तीन चार वनस्पती ओळखल्या जात असल्या तरी खरी ब्राम्ही एकाच असून फक्त तिच्यातच ब्राह्मीन नावाचा क्षार मिळतो .तिचे शास्त्रीय नांव bacopa monerri आहे .
ब्राह्मी ही वनस्पती नाल्यासारख्या घाणीच्या पाण्यात खूप चांगली वाढलेली दिसते . मुख्यतः ती दलदल असणाऱ्या वातावरणात उत्तम प्रकारे वाढते .
शहरात बाल्कनी मधल्या छोट्याशा बागेत घरच्याघरी लागवड करावी अशी सुंदर वनस्पती आहे ही ....
तिचे काही मुख्य उपयोग पाहूया ..
१. मेंदूला पुष्ट करून शांतता देण्याचे अनमोल कार्य ब्राह्मी करते . वेड लागणे , फिट येणे अशा आजारात ती फार उत्तम गुणकारी दिसते ..
२. लहान मुलांच्या सर्दी , खोकल्यात चमचाभर ताजा रस दिला तर उलटी होऊन त्रास कमी होतो .
३. खूप बोलण्याने आवाज बसला असेल तेव्हा याच्या पानाची गोळी तोंडात धरली तर फायदा होतो .
४. ब्राह्मीचा रस सूज आलेल्या आणि गरम असणाऱ्या सांध्यांवर लावल्याने वेदना कमी होतात .
५. ब्राह्मीचा चमचाभर रस रोज पहाटे मधासोबत घेतला तर तो आयुष्यवर्धक आहे . ब्राह्मीने भूक मंदावते म्हणून भूक वाढवणारे सुंठीसारखे चूर्ण घ्यावे .
ब्राह्मीचा रस ताजाच घ्यावा उकळून काढा घेतला तर त्यातले महत्वाचे तेलं उडून जाते .

No comments:
Post a Comment