जायफळ : आजीबाईच्या बटव्यातले बहुगुणी औषध ....

लहान मुलांना गुटी उगाळून देताना जवळ जवळ प्रत्येक भारतीय आईला माहित असलेले जायफळ हे एक महत्वाचे औषध आहे ...
तस पाहायला गेलं तर जायफळ सर्वत्र सहज उपलब्ध होते . घरात एखाद दुसरे जायफळ असणे आवश्यक आहे हे पुढील लेख प्रपंचावरून सर्व सुज्ञ वाचकांच्या लक्षात येईलच ....
जायफळाचे काही सामान्य उपयोग .
१. जायफळ हे सूजनाशक तसे वेदना कमी करणारे आहे . त्यामुळे जायफळाचा गरम पाण्यात उगाळून केलेला लेप अशा दुखऱ्या आणि सूज आलेल्या जागी लावला तर खूप फायदा होतो .
२. दुर्गंधी असणाऱ्या त्वचारोगात जायफळ मिश्रित मलम उत्तम उपयुक्त आहे . किंवा दुर्गंधयुक्त जखमेवर याचे चूर्ण फवारतात .
३. त्वचा शिथिल पडायला लागली कि जायफळाच्या तेलाने अभ्यंग करावा .
४. लहान मुलांच्या सर्दी पडश्यावर तेलात जायफळ उगाळून त्याचा लेप कपाळावर लावतात .
५. जुलाब लागले तर बेंबीवर जायफळाचा लेप करावा . किंवा जायफळ उगाळून चाटायला द्यावे .
६. जास्त मात्रेत जायफळ मादक परिणाम करते . त्यामुळे रात्री झोपताना दुधातून जायफळ घेतले तर अनिद्रा हे लक्षण कमी होते .
७. कामोत्तेजक आणि शुक्रस्तंभक म्हणून जायफळ उत्तम कार्य करते .. त्यामुळे शीघ्रपतनासाठी आधुनिक हानिकारक औषधे घेण्यापेक्षा जायफळाचे १ टीस्पून बारीक चूर्ण १ ग्लास गरम दुधातून संभोगापूर्वी एक ते दीड तास आधी घ्यावे .
८. ताप आणि जुलाब अशी लक्षणे एकत्र असतील तर जायफळ उपयुक्त आहे .
अशा जुलाबानंतर आलेला थकवा जायफळ त्वरित दूर करते .
९. जुनाट सर्दी , खोकला , दमा , उचकी अशा विकारात जायफळ चूर्ण मधातून चाटावे .
१०. जायफळ हे पचन संस्थेवर उत्तम उपयुक्त आहे . मुखापासून गुदद्वारा पर्यंत सर्वत्र पचनाची शक्ती वाढवायची अदभूत ताकद या औषधात आहे .
११. सातत्याने तहान लागत असेल तर जायफळाचे चाटण द्यावे ....
१२. चेहऱ्यावर मुरूम असतील तर रात्रीच्या वेळी झोपताना दुधात जायफळ उगाळून चेहऱ्यावर फक्त मुरुमांच्या ठिकाणी लावावे . आणि रात्रभर तसेच ठेवावे ... मुरुमांचा त्रास खूप कमी येतो .
१३. सर्दीमुळे डोकेदुखी होत असेल तर पाण्यात जायफळ उगाळून लावावे .
१४. पारंपारिक विडा तयार करताना मुखदुर्गंधी नाशक म्हणून जायफळ चूर्ण पानात घालतात ...

No comments:
Post a Comment