गुलकंद (प्रवाळयुक्त ) : शरीराची उष्णता कमी करणारे एक सुंदर औषध .....

ऑक्टोबर हिट चा फटका हल्ली जरा जास्तच आहे ... अशा अतिउष्ण काळात माझे सर्वात आवडते औषध म्हणजे प्रवाळयुक्त गुलकंद .... किमतीने थोडे महाग असले तरी अत्यंत शीतल गुणधर्माचे आणि तत्काळ शरीराला आराम देणारे हे औषध आहे ...
गुलकंद तयार करायची पद्दत :
गुलकंद तयार करताना विशिष्ट गुलाबच चालतो हे लक्षात घ्यायला हवे .. कोणताही गुलाब गुलकंद तयार करताना वापरू शकत नाही ...
देशी गुलाबाची फुले हलक्या गुलाबी रंगांची फुले अत्यंत सुंदर असतात ....त्यांना घमघमीत गोडसर सुगंध असतो हीच फुले गुलकंद तयार करायला वापरतात ...
अशी साधारण २०० ताजी फुले घेऊन त्यांच्या पाकळ्या काढाव्यात.....
गुगुल जाळून त्याची धुरी देऊन शुद्ध केलेल्या एक ते सवा फुट उंचीची काचेची बरणी घ्यावी ....
दीड ते दोन किलो खडीसाखर बारीक करून घ्यावी त्यात २५ ग्राम चांगल्या प्रतीचे प्रवाळभस्म घालून मिसळून घ्यावे ....
बरणीच्या तळाला साधारण अर्धा इंच बारीक केलेल्या खडीसाखरेचा थर करावा त्यावर गुलाब पाकळ्यांचा एक इंचाचा थर करावा त्यावर पुन्हा साखरेचा अर्धा इंच थर .... असे होतील तेवढे थर करावेत .... शेवटच थर साखरेचा होईल अशी काळजी घ्यावी ...
बरणीच्या तोंडाला स्वच्छ फडके बांधून त्यावर झाकण लावावे ....आणि रोज ती बरणी कडक उन्हात ठेवावी ....साधारण दोन आठवड्यात गुलकंद तयार होतो ...
तीनचार आठवडे तो अंधारात ठेऊन मग वापरायला काढावा ....
उपयोग :
१) प्रवाळयुक्त गुलकंद हे शरीराची उष्णता कमी करणारे पारंपारिक औषध आहे ...
२) उष्णतेमुळे अंगाला खाज येणे , थकवा , लघवीला जळजळ अशा सर्व स्थितीत हे औषध वापरू शकतो ...
३) स्त्रियांमध्ये अंगावरून लाल किंवा पांढरा स्त्राव जात असेल त्यासाठी हे औषध अमृत आहे ..
४) गुलकंद रोज सकाळी दहाच्या सुमारास थंड दुधात मिसळून घ्यावा .... त्याने शरीरात उत्साह टिकून राहायला मदत होते ....हे एक साधे पण प्रभावी टोनिक आहे ...
५) प्रवाळयुक्त गुलकंद हा रक्तामधील उष्णता कमी करत असल्याने नाकातून रक्तस्त्राव होणे , उलटीतून रक्त पडणे , पाळीच्या वेळी जास्त रक्तस्त्राव होणे अशा आजारात उत्तम आराम देतो ...
६) कावीळ झाल्यावर आणि होऊन गेल्यावर शरीरातली उष्णता कमी करण्यासाठी गुलकंद साधारण दीड महिने सेवन करावा ...
७) पोटात आग होऊन शौचास होत असेल तर गुलाकंदाचे नियमित सेवन उपयुक्त आहे ...
८) हातापायची जळजळ होत असेल तर गुलकंद खावा त्रास कमी होतो ...
९) सारखे सारखे तोंड येत असेल तर गुलकंद चघळून खावा त्रास कमी होतो ....

No comments:
Post a Comment