मी मराठा

पेटवुन टाकिल आख्खा महाराष्ट्र मराठीच्या जयघोषानं... मी युवा महाराष्ट्राचा... माझी भाषा.....माझा अभिमान...

Thursday, November 6, 2014

केळे : मधुर रसाची संजीवनी ....

केळे : मधुर रसाची संजीवनी ....


केळे हे सर्व ऋतूत असणारे फळ असून ... 
आजकाल याच्या अनेक जाती बाजारात पाहायला मिळतात तरीही अतिशय लहान आकाराचे वेलची केळ सेवनास उत्तम .....
तसेच जास्त पिकल्याने ठिपके पडलेले केळ देखील सेवनास उत्तम ...
केरळ मध्ये चांगले फुटभर आकाराचे मिळणारे केळ भाजीपासून ते वेफर पर्यंत वापरतात ...
केळ्याचे वेफर इतर प्रकृतीस उत्तम आहेत ...

केळ्याचे काही सामान्य आणि औषधी उपयोग पाहू ...
१. केळे मधुर आणि शीत आहे त्यामुळे अंगाचा होत असेल तर पिकलेले केळे खावे ...

२. शौचास पुष्कळ होत असेल तर अर्धवट पिकलेले केळ खावे ..फायदा दिसतो ...

३. केळे पौरुषत्व वाढवणारे असून उत्तम पिकलेली दोन केळी रोज सेवन केल्यास शुक्रधातू उत्तम वाढतो ...तसेच शीघ्रपतनाचा त्रास असणाऱ्या व्यक्तीने देखील भोजनानंतर केळ्याचे सेवन केल्याने उत्तम उपयुक्त ठरते ...

४. मुळव्याध (अर्श ), पोटफुगी , भूक लागत नसेल अशी लक्षणे नित्य असतील तर वेलची केळी सकाळ संध्याकाळ खात जावी ...

५. लहान मुलांनी टाचणी , पिन , बटन , छोटे नाणे अशा गोष्टी गिळल्या असल्यास चार- पाच लहान केळी खाण्यास द्यावीत त्यामुळे कोणतेही नुकसान होता शौचातून या वस्तू बाहेर पडतात ...

६. पिकलेले एक केळ , आवळा रस एक चमचा आणि खडीसाखर एक चमचा घेतल्यास खूप होत असलेली लागवी कमी होते ... तसेच स्त्रियांचे प्रदर व्याधी बरे होतात ....

No comments: