मी मराठा

पेटवुन टाकिल आख्खा महाराष्ट्र मराठीच्या जयघोषानं... मी युवा महाराष्ट्राचा... माझी भाषा.....माझा अभिमान...

Thursday, November 6, 2014

अननस : ब्राझीलमधून भारताला मिळालेली एक रसाळ भेट ....

अननस : ब्राझीलमधून भारताला मिळालेली एक रसाळ भेट ....


अननस हा नजरेत भरतो त्याच्या आकर्षक अशा स्वरूपामुळे ... बाहेरून भरभरीत रुक्षस्पर्शी काटेरी स्वरूप असलं तरी आतून अत्यंत रसाळ आणि मधुर असणारं हे फळ भारतात आजकाल सर्वत्र पिकवले जाते आणि सर्वत्र मिळते सुद्धा ....

अननस तसं पाहायला गेलं तर एक उत्तम औषध आहे ... त्याचे विविध औषधी गुणधर्म पाहूया ...
१) चांगला पिकलेला अननस हा पपई सारखा मांस पचवायला मदत करणारा आहे ....त्यामुळे मांसहार करणाऱ्या लोकांनी अननसाचे सेवन करावे ...

२) अननस काविळीत सेवन करायला एक उत्तम फळ आहे ... कावीळ झाल्यावर रोज पाच सहा चांगल्या पिकलेल्या अननसाच्या फोडी खाव्यात ...

३) अननसाच्या पानांचा रस पिला तर सडकून जुलाब होतात आणि पोटातील जंत कायमस्वरूपी बाहेर पडतात ...(वैद्यकीय निरीक्षण आवश्यक )

४) स्त्रियांना मासिक पाळीच्या वेळी कमी रक्तस्त्राव होत असेल तर कच्च्या अननसाचा रस एक चमचा घ्यावा ....(वैद्यकीय निरीक्षण आवश्यक )

५) गर्भवती स्त्रियांनी चुकुनही अननस खाऊ नये ...अत्यंत वेदनादायक गर्भपाताची शक्यता खूप जास्त असते ...

६) नेहमी सर्दी आणि खोकला होणार्यांनी साधारण पंधरा दिवस सतत अननसाचे चार ते पाच काप खावेत ...

७) दातांचे आणि हिरड्यांचे आरोग्य टिकवण्यासाठी नेहमी अननस खावा ..

८) सांधे सुजून दुखत असतील तर अननस खाल्लावर निश्चित आराम मिळतो ...

९) नियमित अननस खाणाऱ्या लोकांमध्ये साथीच्या आजारांशी लढायची क्षमता खूप जास्त असते ...

१० ) घास गिळताना घशात अडकल्यासारखे वाटून वेदना होत असतील तर दोन तीन दिवस सलग अननस खावा ...

११ ) घनदाट केस हवे असतील तर अननस खावा केसांची चांगली वाढ होते ...

१२) त्वचा सुंदर होण्यासाठी आणि तारुण्य टिकवण्यासाठी अननस म्हणजे अमृत आहे ...

No comments: