ऑक्टोबर मधला कडक " उन्हाळा " करूया थंडगार .....

गम्मत वाटते न ?
उन्हाळा पण ऑक्टोबर महिन्यात ???
ज्याला आपण " ऑक्टोबर हिट " म्हणतो तो काळ म्हणजे आताचा ...
पाऊस पाडून गेल्यावर सूर्याचे जे दर्शन होते ते आधीच्या शीतल वातावरणामुळे खूप जास्त उष्ण जाणवते ...
या ऋतूत मुळव्याध , अम्लपित्त , हातापायाची जळजळ , कावीळ असे अनेक उष्णतेचे व्याधी बळावताना दिसतात ....
बघूया काही सोप्पे उपाय शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी ...
१. आयुर्वेदानुसार हा काळ म्हणजे शरद ऋतू .... ज्यात शास्त्रोक्त पद्धतीने पंचकर्मातील विरेचन घेता येते ....
किंवा पोट साफ होणारी औषधे किमान आठवडाभर घ्यावीत .उदा. आरग्वध कपिला वटी , बृहत त्रिफळा चूर्ण , अविपत्तिकर चूर्ण ...
२. बाजारात प्रवाळयुक्त गुलकंद भेटतो ... एक ग्लासभर थंड दुधात दोन चमचे गुलकंद टाकून त्याचा मिक्सर वर मिल्क शेक बनवून प्यावा ... शरीरातील उष्णता वेगाने कमी व्हायला मदत होते ....
३. बाजारात वाळ्याच्या मुळ्या मिळतात ... तो माठाच्या थंड पाण्यात घालून ठेवावा ...एक मंद सुगंध असणारे आणि त्वरित तहान कमी होईल असे पाणी तयार होते ... पिण्यासाठी तेच वापरावे ... फ्रीज मधील अतिथंड पाणी चुकुनही वापरू नये ...
४. सब्जा बी तीन ते चार तास थंड दुधात भिजवून ठेवावे ....आणि खडीसाखर मिसळून घ्यावे ...किंवा भिजवलेल्या सब्जा बी सोबत गुलकंदाचा मिल्कशेक घेतला तर उत्तम ...
५. शरीरात उष्णता वाढत आहे असे वाटले तर बाजारात उशिरासव मिळते ते दिवसातून तीनदा तीन चमचे घ्यावे ...किंवा चंद्रकला वटी दिवसातून दोनदा घ्यावी ...(वैद्यकीय निरीक्षण अत्यावश्यक....)
६. रात्री धने आणि चंदन पावडर एक एक चमचा एक लिटर पाण्यात वेगवेगळी भिजत ठेवून ते पाणी दिवसभरात प्यावे ...
७. अंगाची आग आग होत असेल तर चंदन गुलाबपाण्यात उगाळून त्याचा पातळ लेप अंगाला लावावा .. किंवा कोरफड कापून ती अंगावर चोळावी ....
८. घरात थंडावा राहावा म्हणून वाळ्याचे पडदे लावावेत त्यांच्यावर गुलाबपाणी मिश्रित थंड पाण्याचा शिडकावा करावा ....
९. अंघोळीपूर्वी अंगाला नारळाचे दुध लावून पंधरा मिनिट ठेवावे ... मग उटणी लावून खस अत्तर मिसळलेल्या थंड पाण्याने अंघोळ करावी ....दिवसभर उत्साह टिकून राहतो ....
अपथ्य :
१. उन्हात फिरायला जाऊ नये , जायचेच असेल तर सुती आणि पांढर्या रंगाचे कपडे आणि टोपी अवश्य वापरावी ...
२. रात्री जागरण करू नये .
३. हिरवी मिरची , तिखट ,चमचमीत पदार्थ खाऊ नयेत.

No comments:
Post a Comment