केतकी (केवडा ) : समशीतोष्ण वातावरणातील हेमसुन्दरी ....

केवडा हा आपल्या सर्वांना परिचित असेलच ... देवी पूजनात केवडा असेल तर वातावरण जास्त सात्विक जाणवते ..... केवडा केवळ त्याच्या सुगंधामुळेच प्रसिद्ध आहे असे नाही तर अनेक ठिकाणी त्याचे उत्तम औषधी उपयोग आहेत ....
केतकीची स्त्री आणि पुल्लिंगी अशी दोन प्रकारची फुले असतात ...पुल्लिंगी पुष्प पांढरे असते आणि ते फांदीच्या मध्यातून बाहेर येते ...स्त्रीपुष्प थोडे लहान , पिवळ्या रंगाचे आणि घमघमीत सुगंध असणारे असते ....साधारण पावसाळ्यात फुले आणि शरद ऋतूत फळे येतात ....
उपयोग :
१) केवड्याचे तेल तयार करतात ... ते उत्तम वातशामक असून कंबरदुखी , स्पोन्डीलायटीस अशा आजारात वापरतात ...
फिट्स येणाऱ्या व्यक्तींमध्ये या तेलाचे शास्त्रोक्त नस्य केले तर फायदा दिसतो ..कान दुखत असेल तर हे तेल कानात टाकतात ...
२) केवड्याच्या फुलाची रचना कणीस सारखी असते ... केवड्याचे पुंकेसर चूर्ण हे न भरून येणाऱ्या जखमांसाठी उत्तम कार्य करतात ....
३) पूर्वीच्या काळी राजे महाराजे लोक अंघोळीच्या पाण्यात केवड्याचे अत्तर टाकू स्नान करीत ज्याने अंघोळी नंतर अंगाला कोणते वेगळे सुगंधी द्रव्य लावायची आवश्यकता नसे ....
४) केवड्याच्या मुळापासून तयार केलेले तेल दक्षिण भारतात वात विकारांसाठी वापरतात ...हेच तेल स्त्रियांमधील वंध्यत्व नष्ट करण्यासाठी तसेच गर्भपात थांबवण्यासाठी वापरतात ...
५) गोवर कांजिण्या अशा त्रासदायक पिडीकायुक्त त्वचारोगांत केवड्याच्या फुलांचे सरबत थंड पाण्यातून दिले जाते ....ज्याने अंगाची आग कमी होते आणि अंगावर जास्त पुळ्या उठत नाहीत ...
६) पुरुषांमध्ये शुक्र बीज कमजोर असेल तर केवड्याचा वापर औषध म्हणून करता येतो .....
७) केवड्याच्या फुलांचा सुगंध शारीरिक मानसिक थकवा दूर करतो....
८) मेंदूला अशक्तपणा येणाऱ्या डीमेंशिया सारख्या आजारात, तसेच ज्ञानइंद्रिय दुर्बलता असेल तर केवड्याचा वापर करता येऊ शकतो ....

No comments:
Post a Comment