शेवगा : कोणतीही शरीरिक वेदना नाहीशी करणारा एक योद्धा ....

शेवगा हा माझ्या आवडत्या वनस्पतींपैकी एक आहे ... शेवग्याची झाडे सर्वत्र आढळतात ... मूळ , खोड , पाने , शेंगा , बिया आणि बियांचे तेल सर्व काही औषधोपयोगी आहे...
आयुर्वेदातले माझे एक गुरु मला नेहमी सांगत कि कि शेवग्याचे दैवी गुण कळले तर जशी पूर्वी सोन्यासाठी युद्धे होत तशी पुढच्या काळात शेवग्यासाठी होतील ....
शेवग्याच्या शेंगाची आमटी तर सर्वांची लाडकी आहेच पण ती बनवायची पद्धत थोडी बदलली तर ती नक्कीच आरोग्य वर्धक होईल .... शेवग्याच्या शेंगा धुवून आणि चिरून आमटी बनवावी ... नेहमी करतो तशी त्यांची साल सोलू नये ... आमटी थोडी कडवट होईल ....पण पूर्ण आरोग्यदायी असेल !!!
शेवगा हा अतिशय उष्ण असून शरीरात जेवढे वाताचे आजार होतात त्या सर्व आजारांवर तो चालू शकतो ... अगदी मेंदूत गाठी झाल्या असतील तर तिथेहि शेवगा उपयुक्त ठरलेला आम्ही आमच्या एक गुरुंकडे पाहिला आहे ...मात्र वैद्य हा तेवढा निष्णात असावा लागतो नाहीतर शरीरातील उष्णता वाढून रुग्णाला त्रास होऊ शकतो ...
शेवग्याच्या बियांपासून काढले जाणारे तेल बेनऑईल म्हणून प्रसिद्ध असून वेदना होणार्या भागावर ते चोळले असता त्या लगेच कमी होताना दिसतात ...
रक्तदुष्टी मुळे अंगावर करट उठतात ... ते पिकत नसतील तर शेवग्याच्या पानांची चटणी गरम करून तिथे बांधावी ...
डोके जड असते , नेहमी कफ असतो आणि खूप डोके दुखते अशावेळी बियांचे वस्त्रगाळ चूर्ण नाकात फुंकरावे ... ( वैद्यकीय निरीक्षण आवश्यक )
ज्या स्त्रियांना पाळी वेळेवर येत नसेल , त्यावेळी पोटात वेदना होत असतील , कमी रजःस्त्राव असेल अशांनी शेवग्याची पाने आणि शेंगा आठवड्यातून दोन तीनदा तरी आहारात घ्याव्यात ...( वैद्यकीय निरीक्षण आवश्यक )
शेवग्याच्या शेंगा कोलेस्ट्रोल वाढू देत नाहीत ...
पूर्वायुष्यात मधमाशी , गांधील माशी , विषारी कीटक , सर्प दंश , विंचू दंश असे दंश झाले असतील तर त्यातली विषे शरीरातून समूळ नाहीशी व्हावीत यासाठी शेवग्याच्या पानांची भाजी नित्य सेवन करावी ...
सारखे नैराश्य येणाऱ्या व्यक्तींनी शेवग्याच्या शेंगांची आमटी नियमित खावी ...
शेवगा आहारात नित्य असेल दुध आणि तूप देखील आहारात ठेवावे त्यामुळे उष्णतेचे विकार होत नाहीत ...
विशेष सूचना :
शेवगा कुणी वापरावा यांसाठी बरीच बंधने आहेत ...
उष्णतेचे विकार आणि सदैव चिडचिड करणाऱ्या व्यक्तींनी शेवगा अजिबात खाऊ नये ...
रक्त आणि पित्त यांचे आजार असतील शेवगा वर्ज्य आहे ...

No comments:
Post a Comment