मी मराठा

पेटवुन टाकिल आख्खा महाराष्ट्र मराठीच्या जयघोषानं... मी युवा महाराष्ट्राचा... माझी भाषा.....माझा अभिमान...

Tuesday, September 18, 2012

तुझ्या लग्नाला मात्र मी नक्की येईन.....


तुझ्या लग्नाला मात्र मी नक्की येईन.....
तुझ्या लग्नाला मी नक्की येईन,
माझ्या शुभेच्छा मी तुला देईन;
तुझ्या लग्नाला मात्र मी नक्की येईन.....

मी वेड्यासारखं प्रेम केलं तुझ्यावर,
पण तुला माझी भावना कधीच कळली नाही;
आणि आता कळूनही फायदा नाही,
त्यासाठीची योग्य वेळ आता उरली नाही;
एकांतात बसून मी, तुझ्याच आठवांना स्मरीन....
तुझ्या लग्नाला मात्र मी नक्की येईन.....

प्रेम व्यक्त करण्याचं धाडस,
माझ्याकडून झालंच नाही;
शब्दांना ओठांबाहेर,
कधी पडताच आलं नाही;
माझ्या दुःखाचे निखारे आता, मी कागदावरच जपीन....
तुझ्या लग्नाला मात्र मी नक्की येईन.....

तुझ्यासाठी लिहीलेल्या कवितांना,
आता काहीच अर्थ उरला नाही;
तुझ्याचसाठी रचलेल्या गीतांचा,
सूर कधीही जुळला नाही;
तुझ्या आग्रहाखातर सखे, मी मंगलाष्टके गाईन....
तुझ्या लग्नाला मात्र मी नक्की येईन.....

तुझ्या सोबत जगण्याची;
स्वप्नं आता विरून गेली;
हळव्या माझ्या ह्रदयाला,
यातना देऊन गेली;
आयुष्यभर आता मी, माझाच अपराधी राहीन.....
तुझ्या लग्नाला मात्र मी नक्की येईन.....

No comments: