मी मराठा

पेटवुन टाकिल आख्खा महाराष्ट्र मराठीच्या जयघोषानं... मी युवा महाराष्ट्राचा... माझी भाषा.....माझा अभिमान...

Friday, April 29, 2016

शंभू चरित्रं भाग :- १२

शंभू चरित्रं भाग :-  १२
तो आला सरळ संभाजी राजांकडचं औरंगजेबाला दुसरं कोणी नमवू नाही शकत...औरंगजेबाला दुसरं कुणी झुकवू नाही शकत. औरंगजेबाला दुसरं कुणी मातीत गाडू नाही शकत
एकचं ""संभाजीराजे""
संभाजी राजांजवळ मैत्रीचं फर्मान घेऊन आलेल्या अकबरला संभाजींनी हाताश आणि आपल्या राजकारणाच्या पटाव केली. पण! लागोपाठ तीन तडाखे बसलेला औरंगजेब चवताळून उठला. आग्यामोहळं उठावं असा औरंगजेब पिसाळला आणि उचलली पाऊलं त्यांनी "खासे दख्खन" वरं औरंगजेबाचे "साम्राज्यं" म्हणजे आशिया खंडातलं सगळ्यात मोठं "साम्राज्यं". आणि संभाजींच "स्वराज्य" म्हणजे आशिया खंडातलं सगळ्यात छोटं "साम्राज्यं". मनंभर सैन्यं कणभर मराठ्यांना चिरडायला निघालं. औरंगजेबाच्या नुसत्या सरदारांची सं चौदा हजार होती, कईक नातंलग, शहजादे, अफाट-अफाट सेनापती, चार लाखांचं सैन्यं, चौदा कोटींचा खजिना, चाळीस हजार घोडी, सत्तर हजार घोडी, पस्तीस हजार उंट. अरे! औरंगजेबाची छावणी पडली तरं तीन मैलांचा परिसर व्यापून जायचा. एवढं अफाट सैन्यं आलं चालून महाराष्ट्रावरं आणि सह्याद्रीच्या कड्यांवरनं कडाडला छावा!..."येऊद्या त्या औरंगजेबाला, अखेरं! त्याला त्याच्या मरणाची जागा कळल आता बघेल या छाव्याचा "गनिमी कावा". आणि बघता बघता संभाजी सज्ज झाला. वय वर्ष अवघं तेवीस. महाराष्ट्राचं आभाळ काळवंडून गेलं. औरंगजेबानं एकापाठोपाठ मोहिमी लगडल्या. सरबुलंद खान, आलेखान, फ़तेह्खान, शहजादा अज्जम, बेदारबख्त मुअज्जम, शहाबुद्दीन खान, बहादूर खान, एक-एक नामचीन सेनापती अफाट ताकदीने महाराष्ट्राला कैचीत पकडायला चाहोबाजूंनी आत घुसवले आणि मराठे सज्ज झाले. संभाजी राजांच्या नेतृत्वाखाली त्यांन चालू केली. मराठे सुसाट सुटले. जिथं भेटेल तिथं मोघलांना कपात राहिले. अरे! सरबुलंदखान मारं खाऊन परतला, फ़तेह्खान तोंड काळं करून गेला, तो बहादूर खान नुसता पळून पळून दमला, शहाबुद्दीन खानला तरं काही सुचेना. औरंगजेब चहोबाजूंनी नुसत्या शिखस्तीच्या बाराहिला.
🚩🚩जय शंभूराजे🚩🚩

No comments: