शंभू चरित्र भाग :- १३
हार पराभव, हार-पराभव. अरे! तेवीस वर्षाचा 'छावा' संभाजी मोघलांना पार सळो कि पळो करून सोडलं. तू महाराष्ट्रात येतो ना! संभाजी राजांनी विलक्षण युद्धनीती खेळली, मराठ्यांच्या फौजा सरळ मोघलांच्या प्रांतात घुसवल्या. इतकं इतकं फाडलं कि औरंगजेबाला काही कळेना, मराठे तिथं आले म्हणून सैन्यं पाठवावं तरं मराठे पुढं, मराठे तिथं गेले म्हणून सैन्यं पाठवावं मराठे त्याच्या पुढं, अरे! कुठं कुठं शिवावं? सगळीकडंच फाटत निघालंय. इथं शिवावं तरं तिथं मराठे फाडतायत, तिथं शिवावं तरं मराठे तिकडं फाडत निघालेत. कुठं कुठं? ठीगळं लावावी. वैतागून, संतापून गेला औरंगजेब. आपल्या सरदारांवर बरसत राहिला..."क्या करतें हो बंदोबस्त? खिल्लतें पेहेनके ख़ाली मारं खातें हो! इतनी फ़ौज दी दिमत ने कहाँ गयी? कहाँ गया वों दख्खन का चुहाँ ? तसा कुणी सरदार म्हणाला, "हुजुर वों संभा सैतान है!......अरे! फ़िर हम कहां सैतान से कम है!...फ़िर भी क्यों शिखस्त? फ़िर भी क्यों हार?" औरंगजेबानं मोठ्या थाटात मराठ्यांविरुद्ध ची मोहीम उघडली पण! संभाजी राजांनी त्याची पुरती वाट- वाट-वाट लावली. कडाडला संभाजी राजा,""आमच्याच वाटेवर येऊन...आमच्याशीच वाटमारी करणाऱ्याची...त् याच्या वाटेवर जाऊन...वाट लावल्याशिवाय...आमच्या वाटेवर परतत नाही आम्ही""..."तलवा रीच्या टोकावर भाकरी भाजतात मराठे तुला भाजायला वेळं नाही लागणारं!!!" आणि बघता बघता मराठे भाजत- भाजत सुटले. त्या धगीनं औरंगजेब हैराण झाला.
🚩🚩जय शंभूराजे🚩🚩
No comments:
Post a Comment