मी मराठा

पेटवुन टाकिल आख्खा महाराष्ट्र मराठीच्या जयघोषानं... मी युवा महाराष्ट्राचा... माझी भाषा.....माझा अभिमान...

Monday, April 25, 2016

शंभू चरित्रं भाग :- ०१

शंभू चरित्रं भाग :- ०१
इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाही आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही" हाही एक इतिहास आहे. 'निरक्षरं मराठ्यांचा' इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा इतका "तेजस्वी" आणि "ओजस्वी" इतिहास याच मातीत घडला मात्रं 'साक्षरं मराठे' त्यापासून बेदखल राहिले कि काय? अशी शंका अलीकडे येऊ लागली आहे. पण! "शिवशंभू" चरित्राचं कर्तृत्वं ऐकण्यासाठी आपण मोठ्या संख्येनं एकवटतो एवढी एकचं गोष्ट तुमच्या आमच्या काळजामध्ये "राजा शिवशंभू" अजूनही जिवंतआहेत. याचीच ती साक्षं. "इथल्या मातीचा एखादा ढेकूळं कधी हातात घेतला तो पाण्यात टाकला,तरं पाण्यावरं जो तवंग उठेल तो तवंग सुद्धा या मातीसाठी खर्ची पडलेल्या मावळ्यांच्या आजूबाजूच्या सह्याद्रीची उंची वाढल नाही,"या सह्याद्रीच्या पायाखाली घेतलयं तेव्हा तो सह्याद्री आसमानाशी स्पर् या सह्याद्रीची सैरं करणं कोणा ऐऱ्याचं गैऱ्याचं काम नाही,
सह्याद्रीची सैरं फक्तं तीघचं करू शकतात. पहिला"वाघ",दुसरा"वारा" आणि तिसरे"मराठे"!!! या तिघांशिवाय सह्याद्री पेलनं कुणाला जमलं नाही साधलं नाही. या सह्याद्रीच्या कुशीत पुन्हा कचरीलाचा जन्मं कधी झालाचं नाही. इथं जन्माला आले ते "शिवराय" आणि "शंभूराय".
३५० वर्षापूर्वीचा जागरं आजही घडतोयइथं. "छत्रपती शिवाजी महाराजांचं" नाव कानांवर पडतं आणि आमच्या शरीरावरं रोमांच उठतात, "छत्रपती शिवाजी महाराज कि जय" अशी किल्कारी कुठं निनादते आणि आमचं शरीरं पेटून उठतं. मनमनांमध्ये उर्मिजाप, निर्णाजाय, प्रेरणास्त्रोत तयार होतो. अरे! ३५० वर्ष झाली या राजाला आम्ही विसरू शकतं नाही. अरे! दूरवरं कुठेतरी किल्कारी ऐकू येते "छत्रपती शिवाजी महाराज कि" आणि आमच्या ओठातून कधी "जय" बाहेर पडतं आमचं आम्हाला कळतं नाही. जणू काय आमच्या धमन्यांतून सळसळनाऱ्या रक्ताच्या थेंबा- थेंबामध्ये तो "राजा शिवाजी" अजूनही जिवंत आहे. जणू काय इथल्या मातीमध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्तेक पोराच्या भाळावरं इथली माती जन्मतःचं "शिवाजी" हे नाव कोरूनचं त्याला जन्माला घेते कि काय असं सांगावं इतकी जादू या राजाची आहे. असं काय केलं असेल या राजानं!!! असं काय निर्माण करून ठेवलं असेल!!! ३५० वर्षानंतर जर शिवरायांचं नाव घेऊन आमचं शरीरं पेटतं असेलं, ३५० वर्षानंतर जर शिवरायांचं नाव घेऊन आम्हाला स्फूरणं चढतं असेलं तर ३५० वर्षापूर्वी खुद्द "शिवछत्रपतींच्या" कुशीत जन्माला आलेला "संभाजी राजा" कसा असेलं !!! अरे! कसा घडला असेलं!...कसा उभा राहिल असेलं शौर्य!...कसं असेलं धैर्य!...कसं असेलं धाडसं!...कसं असेलं साहसं!...कसा असेलं अभिमान!...कसा असेलं स्वाभिमान!...कसा असेलं पराक्रम! कसं असेलं नेतृत्वं, व्यक्तीत्वं, कर्तृत्वं!!! कसा असेलं...... "संभाजी राजा".
🚩🚩जय शंभूराजे🚩🚩

No comments: