मी मराठा

पेटवुन टाकिल आख्खा महाराष्ट्र मराठीच्या जयघोषानं... मी युवा महाराष्ट्राचा... माझी भाषा.....माझा अभिमान...

Thursday, November 6, 2014

लवंग : भारतीय स्वयंपाकघरातील दिव्यगंधी श्रीपुष्प ...

लवंग : भारतीय स्वयंपाकघरातील दिव्यगंधी श्रीपुष्प ...


लवंग माझ्या सर्वात आवडत्या औषधांपैकी एक आहे ... आमचे कुठे नं कुठे दौरे चालूच असतात ... चिकित्सालयात आम्ही उपस्थित नसतो ....अशा वेळी कोणत्याहि रुग्णाचा अचानक फोन आला कि त्याला लवंग हे अत्यंत सहज मिळणारे आणि प्रभावी औषध म्हणून सांगता येते ....

लवंग हि खरी तर त्या वनस्पतीच्या फुलाची वाळवलेली कळी आहे ... म्हणून लवंगकलिका हा शब्द लवंगेसाठी जास्त योग्य आहे ...

लवंग अनेक आजारात सहज वापरता येते ..
१) डोके दुखत असेल , सर्दी- पडसे होऊन सारख्या शिंका येत असतील तर लवंगेचा लेप कपाळावर लावावा ...

२) दात किडून तोंडाला घाणेरडा वास सारखा येत असेल तर दिवसातून तीनदा लवंग चघळून ती गिळावी ...

३) रात्रीचा खोकला खूप येत असेल तर दोन लवंगा दाढेत ठेवून त्यांचा रस गिळत राहावे ... हाच उपाय दम लागणाऱ्या व्यक्तीमध्ये पण फायदेशीर ठरतो ..

४) लवंगाचे तेल जंतुनाशक असते .... कोल्हापूरला जिल्हा उपरुग्णालयात इंटरशिप करत असताना स्वाईन फ्लूच्या रुग्णांचा खूपच जास्त संपर्क आला होता.. तेव्हा आयुर्वेदातल्या एका गुरूंनी स्वाईन फ्लूची लस न घेता भीमसेनी कापूर आणि लवंग तेल यांचा एकत्र सुगंध दर अर्ध्या तासाने घ्यायला सांगितले होते ... परिणामी खूप विषाणूजन्य वातावरणात साधी सर्दी पण त्या काळात झाली नाही ....

५) लवंगेचे तेल अत्यंत तीक्ष्ण असते.... सायटिका , कंबरदुखी , आमवात अशा वेदनादायक आजारात भीमसेनी कापूर मिसळून अभ्यंग केले कि वेदना कमी व्हायला खूप मदत होते ...

६) तोंडाला सारखा कफाचा चिकटा येत असेल तर लवंग चघळावी ... तोंड लगेच स्वच्छ होते ...

७) पोटात टोचल्यासारख्या वेदना होऊन उलट्या होत असतील तर पाच सहा लवंगा उकळून त्याचा चहा करून देतात ....

८) क्षय रोगी व्यक्ती खोकल्यावर आणि कफ पडल्यावर भयंकर घाणेरडी दुगंधी येते ती कमी व्हावी यासाठी लवंग चघळणे फायदेशीर आहे ...

९) गर्भिणी बाईला उलट्या होत असतील तर लवंग आणि मध यांचे चाटण द्यावे ...

१०) बाळंत झाल्यावर आईला दुध वाढावे आणि ते शुद्ध असावे यासाठी शतावरी कल्प सोबत लवंगेचे चूर्ण द्यावे ...

११) शीघ्रपतन साठी जी औषधे योजली जातात त्या योगांमध्ये लवंग वापरली तर शीघ्रपतनाचा त्रास कमी होतो ...

१२) ताप आल्यावर आपण तुळशीच्या पानांचा काढा करतो त्यात दोन लवंग कुटून घातल्या कि ताप लवकर उतरून रुग्णाला हलके वाटते ...

लवंग अशीच त्वरित गुण देणारी दिव्य आहे ...तिच्याबद्दल लिहावे तितके कमीच ...

|| जय जय रघुवीर समर्थ ||
|| श्रीकृष्णार्पणमस्तु ||

1 comment:

AOS Products said...

your post is Really Awesome, come on my Organic Essential and Carrier oils webpage: natural essential oils suppliers in India in India's Top City Ghaziabad City.