हसण्यावर माझ्या जाऊ नका,
दिसत तस काहीच नाही,
मित्रांसोबत असलो तरी,
एकलेपण जात नाही.
पुन्हा पुन्हा तेच करतो,
आठवनीं पासून दूर पळतो,
कितीही सत्यात जगलो तरी,
भास सारखा तिचाच छळतो.
कधी उरतो थोडा थोडा ,
मग जगतो जरा जरासा,
विसरलो सारे आता म्हणुनी ,
देतो रोज खोटा दिलासा .
आता मनालाही कळून चुकलाय,
माझा हा लपंडावाचा खेळ,
मी ही निरुत्तर झालो आता ,
निघून गेली केव्हाच वेळ.
- शशांक प्रतापवार
दिसत तस काहीच नाही,
मित्रांसोबत असलो तरी,
एकलेपण जात नाही.
पुन्हा पुन्हा तेच करतो,
आठवनीं पासून दूर पळतो,
कितीही सत्यात जगलो तरी,
भास सारखा तिचाच छळतो.
कधी उरतो थोडा थोडा ,
मग जगतो जरा जरासा,
विसरलो सारे आता म्हणुनी ,
देतो रोज खोटा दिलासा .
आता मनालाही कळून चुकलाय,
माझा हा लपंडावाचा खेळ,
मी ही निरुत्तर झालो आता ,
निघून गेली केव्हाच वेळ.
- शशांक प्रतापवार
No comments:
Post a Comment