मी मराठा

पेटवुन टाकिल आख्खा महाराष्ट्र मराठीच्या जयघोषानं... मी युवा महाराष्ट्राचा... माझी भाषा.....माझा अभिमान...

Sunday, September 16, 2012

बघ आई आकाशात सूर्य हा आला।


बघ आई आकाशात सूर्य हा आला।
पांघरून अंगावर भरजरी शेल॥
निळ्या याच्या महालाला खांब सोनेरी।
मोतियाच्या लावलेल्या त्यात झालरी॥
केशराचे घातलेले सडे भूवरी।

त्यावरून येई याची डौलाने स्वारी॥
डोंगराच्या आडून हा डोकावी हळू।
आणि फुले गुलाबाची लागे उधळ॥
मंद वारा जागवितो सा-या जगाला।
म्हणतसे उठा उठा मित्र हा आला॥

नभातून सोनियाच्या ओती तो राशी
गुदगुल्या करी कशा कळ्या फुलांसी
पाखरांच्या संगे याची सोबत छान
गाती बघ कशी याला गोड गायन
मंद वारा जागवीतो सार्या जगाला
म्हणतसे ऊठा ऊठा मित्र हा आला

या कवितेचा कवी माहित नाही. कोणाला महित असल्यास सांगावे.


No comments: