मी मराठा

पेटवुन टाकिल आख्खा महाराष्ट्र मराठीच्या जयघोषानं... मी युवा महाराष्ट्राचा... माझी भाषा.....माझा अभिमान...

Tuesday, September 18, 2012

बघा पटतय का...

बघा पटतय का... 

) खिसेकापुच गर्दीत ओरडतो, "खिसापाकीट सम्हालो"
लोक अभावितपणे आपली पाकिंट बघतात आणि
खिसेकापूला लोंकाचा पाकिट ठेवण्याचा खिसा समजतो.

) स्पर्श  करताही आधार देतो येतो हे ज्याला कळतं त्यालाच
'
पालक' शब्द समजला.

) बेदम पैसा मिळवणं याइअतकं मिडीअऑकर ध्येय दुसरं असूच
शकत नाही. माणसं जोडायला त्यापेक्षा जास्त बळ लागतं.

) सर्वात जीवघेणा क्षण कोणता?
खुप सदभावनेने एखादी शुभ गोष्ट करायला जावं आणि
स्वत:चा काहीही अपराध नसताना पदरी फक्त वाईटपणाच
यावा. सदहेतूचीच शंका घेतली जावी हा!

) माणूस निराळा वागतोय, बिघडला. असं आपण पटकन
एखाद्याबद्दल बोलतो. पण तसं नसतं. त्या सगळ्याचा अर्थ
तो आपल्याला हवा तसं वागत नाही एवढाच असतो.

) गैसमज हा कॅन्सरसारखा असतो. तिसऱ्या अवस्थेला
पोहचल्यावर तो आपलं स्वरुप प्रकट करतो.


) अग्निदिव्य करुनही प्रभु रामचंद्राचे डोळे उघडले नाही
किंवा खात्री पटुनही सीतेच्या नशिबातला वनवास टळला नाही
आणि हे सगळं कुणासाठी? तर लोकांचे कपड्याने डाग
स्वत:च्या उदरनिर्वाहासाठी काढणाऱ्या एका धोब्यासाठी.
कुणाच्या समाधानासाठी कुणाचा अंत पाहायचा हे माणसाने
ठरवले पाहिजे.

) जिथं उमटलेला ठसा जतन केला जाईल तिथंच शिक्का
उमटवावा. नाहीतर ते निवडणुकीचे शिक्के होतात.

No comments: