मी मराठा

पेटवुन टाकिल आख्खा महाराष्ट्र मराठीच्या जयघोषानं... मी युवा महाराष्ट्राचा... माझी भाषा.....माझा अभिमान...

Monday, April 25, 2016

शंभू चरित्रं भाग :- ०४

शंभू चरित्रं भाग :- ०४
औरंगजेबाला भर दरबारात मराठी मातीचा दणका दाखवल्यानंतर त्या दिवसापासून "शिवराय" औरंगजेबाच्या दरबारात कधी गेले... न्हवते.पण! शिवरायांचे प्रतिनिधी म्हणून "संभाजीराजे" मात्रं औरंगजेबाच्या दरबारात येत जात असत. एके दिवशी भर दरबारात औरंगजेबानी संभाजी राजांना विचारलं, राजे!!! आपण उत्तमं मल्लविद्या जाणता असं आम्ही ऐकून आहे. आपण उत्तमं कुस्ती खेळता असाही आम्ही ऐकलयं. मगं! संभाजी राजे!!! आमच्या दरबारात सुद्धा चांगले चांगले मल्ल आहेत. आमच्या दरबारातल्या एखाद्या मल्ल? तसा नऊ वर्षाचा छावा कडाडला...." आम्ही फक्तं आमच्या लायकीच्या माल्लांशीच कुस्ती खेळतो आणि तुझ्या दरबारात माझ्या लायकीचा एकही मल्ल नाही...सबब!!!" हे महाराष्ट्राचं पाणी होतं. महाराष्ट्राचा स्वाभिमान संभाजी राजांनी वयाच्या नवव्या वर्ष औरंगजेबाला दाखवला. पण! बघता बघता औरंगजेबाची मुठी आवळ गेली, शिवरायांचा गळा गुदमरू लागला आणि त्याचवेळी शिवरायांना पडायला मुभा नाही. पण! संभाजीराजे मात्रं औरंगजेबाच्या महालापासून ते कुंभाराच्या वड्यापर्यंत बिंदोख येत जात होते. या सगळ्या सुटकेच्या चालीच्या सग सोपविल्या आणि महालापासून कुंभाराच्या वड्यापर्यंत सगळी चाल संभाजी राजानं व्यवस्थित पेरली. आणि बघता बघता दिवस उजाडला जे स्वप्नांतही शक्यं होणारं नाही ते शिवरायांनी सत्यात उतरवलं आणि "महाराष्ट्राचा नरंसिंह" सुटला. औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन निसटला. पण! आपला एकुलता एक पोरं "संभाजी" त्याला मागं ठेवून त्यावेळी एका पित्याचं काळीज गलबलंल नसेल का? जीव व्याकुळला नसेल का? अरे! नऊ वर्ष उमरीच पोरं कसं ठेवावं मागं, मृत्युच्या दारात, औरंगजेबाच्या दरबारात अरे!!! कसं ठेवावं. जरं जातेवेळी त्या संभाजी राजानं विचारलं असतं शिवरायांना, "आबासाहेब..आम्हाला सोडून एकटेचं जाणार?" अरे! तरी हा सुद्धा हटला असता मागं, धरणी कंपच झाला असता, फाटला असता बांध जरं विचारलं असतं संभाजीनी "आबासाहेब आम्हाला सोडून एकटेचं जाणार!!!". पण त्यावेळी हा "सर्जा संभाजी राजा" आपल्या पित्याचा हात हातात घेऊन सांगत होता, "आबासाहेब..आमची फिकीर करू नका, आमच्यापेक्षा महाराष्ट्राला आपली अधिक आहे" आणि आपल्या पोराच्या परिपक्वतेव हा "नरंसिंह" खुश झाला. यताकाल राजे निसटले आणि राजगडावर पोहोचले आणि पोहोचल्या पोहोचल्या त्यांनी संभाजी राजांचं निधनं झालं". वयाच्या नवव्या वर्षी संभाजी राजां मरण बांधलं गेलं ते इंद्रायणी भीमेच्या तीरावरं मरणा निधड्या छातीनं सामोरं जायीपर्यंत ते मरण तशीच त्यांची सोबत करत राहिलं. पण! शिवरायांनी उठवली होती हुलं. राजगडावर तर संभाजींचे अंत्यविधी सुद्धा झाले. येसूबाई सती जायला निघाल्या. जिजाऊ तरं रडून रडून थकल्या पण! सगळी चाल शिवाजींनी आपल्या काळजात मिटून ठेवली तोपर्यंत जोपर्यंत संभाजी राजे सुखरूप गडावर येत नाहीत. हुलं उठवली एवढ्यासाठी कि संभाजींच्या आणि औरंगजेब त्यांचा पाठलाग सोडेल आणि मग सुरक्षित संभाजी राजे गडावर येतील आणि झालं तसचं संभाजी राजे सुरक्षित गडावर पोहोचले पण गेलेला शंभूराजा वेगळा होता आणि पर आलेला संभाजी राजा वेगळा होता. परत आला होता "धाकंला धनी","जाणता", परीपक्वं झालेला","मोघली रियासतीचा",
"राज कारणाचा" अभ्यास करून तयार झालेला......"संभाजी राजा"
🚩🚩जय शंभूराजे🚩🚩

No comments: