मी मराठा

पेटवुन टाकिल आख्खा महाराष्ट्र मराठीच्या जयघोषानं... मी युवा महाराष्ट्राचा... माझी भाषा.....माझा अभिमान...

Monday, April 25, 2016

शंभू चरित्रं भाग :- ०७

शंभू चरित्रं भाग :- ०७
चित्रपटं काही बघितले आम्ही "थोरातांची कमळा", "मोहित्यांची मंजुळा"
काय दाखवलं? "थोरातांच्या कमळा"मध्ये "संभाजी राजे" या थोरातांच्या कमळावर जबरदस्ती करतात. तो आघात सहन न झाल्यामुळे थोरातांची कमळा "आत्महत्या" करते. चित्रपटाच्या शेवटी ती समाधी सुद्धा पण! निवेदन आहे, हि त्या थोरातांच्या कमळाची समाधी त्याच्यावरं काय लिहीलंय ते बघावं तरी! काय लिहीलंय ते वाचलं आश्चर्याचा धक्का बसला......!!!
थोरातांच्या कमळाचं निधन पावल्याचं सालं होतं "१६९८ सालं" आणि संभाजी राजाचं निधन झालायं "१६८९ साली" म्हणजे संभाजी राजांच्या मृत्युनंतर नऊ वर्षांनी थोरातांची कमळा मेली. मग! तीच्यावरं जबरदस्ती करायला "संभाजी राजांच" भूत गेलं होत का? अजूनही प्रश्नं नाही पडला आम्हाला.
अरे!शिव छत्रपतींचा पुत्रं आहे. कल्याणच्या सुभेदाराची सून आईच्या मानाने माघारी पाठवली त्या त्या राजाचा पुत् आहे. अरे! तत्कालीन काळात कईक स्त्रियांचा राणीवास असणं काही गैरं न्हवतं, ना कक्षाळा ठेवणं समाज संमत होतं. किती आहेत संभाजी राजांच्या चरित्रात, दोन नावं आढळतात "दुर्गाबाई" त्याही कैदेत आणि राहिल्या फक्तं "येसूबाई"..."स्त्री सखी राज्ञी जयती" महाराणी येसूबाई यांच्याशिवाय चरित्रातं नावं आढळत नाही कुणाचं. का? स्वतः संभाजी राजांनी राजारामाची ती लग्नं केली, संभाजी राजांनी सहा तरी करावी. अरे! तो अकबरं औरंगजेबाचा मुलगा महाराष्ट्रात आलाय संभाजींची मदत मागायला आणि त्याला मैत्रीचं प्रतीकं म्हणून संभाजी राजांनी "मोत्याचा कंठा" भेट म्हणून दिला. आणि या नादान अकबरानं तो "मोत्याचा कंठा" एका नर्तकीला भेट म्हणून दिला. संभाजी राजांना हि वार्ता कळली आण संभाजी राजे, "ज्याला मैत्रीची कदरं नाही त्याच्याशी कसंलही पत्रं आम्हाला जोडायचं नाही, फिल्तोर सवलती बंद करा...!" का? तरं मी दिलेला मैत्रीचा कंठा त्या अकबरा नर्तकीला दिला. एवढी साधी गोष्ट ज्या "सर्जा संभाजी राजाला" सहन होत नाही तो चारित्र्याच्या बाबतीतं कसा असेल. बाजार गप्पा आहेत सगळ्या बाजार गप्पा...!!!
🚩🚩जय शंभूराजे🚩🚩

No comments: