मी मराठा

पेटवुन टाकिल आख्खा महाराष्ट्र मराठीच्या जयघोषानं... मी युवा महाराष्ट्राचा... माझी भाषा.....माझा अभिमान...

Monday, March 16, 2015

उन्हाळ्यात वरदान ! बहुगुणी कलिंगड
थंडी सरली असून, ऊनाचा तडाखा वाढत आहे. कडक उन्हात बाहेर पडताच थकवा आणि ऊर्जेची कमतरता वाटू जाणवते. यामुळे उन्हाळ्यात कलिंगड हे वरदान आहे. कलिंगड खाण्याचे अनेक फायदे आहे.

उन्हाळ्यात घामासोबत शरीरातील ऊर्जाही बाहेर जाते. अशा हवामानात शरीरात पाण्याची थोडीशी देखील कमतरता झाल्यास अनेक आजारांना आमंत्रण मिळते. यामुळे उन्हाळ्यात शरीराला साखर आणि पाण्याचे संतुलन मिळवून कलिंगड या फळाचे सेवन करावे.

कलिंगड उन्हाच्या काहिलीपासून गारवा देतेच तसेच याच्या दैनंदिन सेवनामुळे शरीरातील पाण्याचे संतुलन कायम राहते. कलिंगड हे एक आरोग्यदायी फळ असून याचे अनेक फायदे आहेत.

नियमित कलिंगड खाण्याचे फायदे

मुतखड्यावर (किडनी स्टोन) गुणकारी
मुतखडा (किडनी स्टोन) दूर करण्यास कलिंगड मदत करते. यामध्ये मॅग्नेशियम आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. पोटॅशियम किडनीला स्वस्थ ठेवते. हे लघवीतील असिडचा स्तर नियंत्रात ठेवते. पोटॅशियमसोबतच यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते. यामुळे किडनी स्टोन बाहेर पडण्यास मदत होते. नियमितपणे कलिंगड खाल्ल्यास किडनी स्टोन होण्याचा धोका कमी होते.
कॅन्सरपासून बचाव करते
कलिंगडमध्ये अँटीऑक्‍सीडेंट आणि व्हिटॅमिन सी तसेच इतर अँटीऑक्‍सीडेंटचा उत्तम स्रोत आहे. हे कॅन्सरचे कारण मानल्या जाणाऱ्या विषाणूंना नष्ट करण्यास सक्षम आहे. अनेक संशोधनांमध्ये लाइकोपेनचे सेवन प्रोस्टेट कॅन्सरसाठी उपयुक्त मानण्यात आले आहे. कलिंगडमध्ये लाइकोपेन तत्त्व आढळून येतात.
सेक्ससाठी उत्तेजीत करते
आधुनिक विज्ञानही कलिंगडला वायग्रापेक्षा जास्त प्रभावकारी मानते. दररोज कलिंगडचे सेवन केल्यास प्रणय शक्ती वाढते. एका अभ्यासात स्पष्ट झाले आहे, की कलिंगडमुळे सेक्स जागृत करणारा हॉमोन्स 'टेस्टास्टेरॉन' उत्तेजीत होऊन तो अधिक कार्यशील होत असतो.
डोळ्यांसाठी फायदेशीर
कलिंगडाचे नियमित सेवन डोळ्यांसाठी फायदेशीर आहे. यामध्ये बीटा-कॅरोटीन आणि व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असल्यामुळे डोळे स्वस्थ ठेवण्यात मदत होते. याच्या सेवनाने रातांधळेपणा आणि मोतीबिंदू यासारख्या डोळ्यांच्या आजारापासून दूर राहिले जाऊ शकते.
त्वचा आणि केसांसाठी उत्तम उपाय
सी व्हिटॅमिनचे पर्याप्त सेवन कोलेजनचे निर्माण करण्यासाठी आवश्यक असते. हे त्वचा आणि केसांसाठी संरचना तयार करते. कलिंगड शरीराला हायड्रेट करण्यास मदत करते,जे त्वचा आणि केस स्वस्थ करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरते. यामुळे याच्या सेवनाने शरीर नेहमी सशक्त राहते. त्वचेवरील सुरकुत्या नष्ट होतात.
वजन कमी करण्यास मदत करते
कलिंगड वजन कमी करण्यासाठी सर्वात उत्तम फळ आहे. यामध्ये असलेले सिट्रयूलाइन नावाचे तत्व शरीरातील वसा कमी करण्यास मदत करते. हे तत्व वसा तयार करणाऱ्या पेशींना कमी करते. कलिंगडामध्ये असेलेले पाण्याचे जास्त प्रमाण डायटिंग दरम्यान एक उत्तम पर्याय ठरू शकते. या व्यतिरिक्त कलिंगडमध्ये भरपूर व्हिटॅमिन्स आणि मिनिरल्स असतात.
पचनशक्ती सुधारते
कलिंगडमध्ये पाणी आणि फायबर भरपूर प्रमाणात असल्यामुळे अपचन, गॅस अशा समस्या होत नाहीत. पचनतंत्र व्यवस्थित ठेवण्यासाठी कलिंगड उपयोगी फळ आहे.
रोग प्रतिकारशक्ती वाढवते  
कलिंगडमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. व्हिटॅमिन सी आपल्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यास मदत करते. यामुळे आपण ताप व संक्रमण (इन्फेक्शन)पासून दूर राहू शकतो.

No comments: