मी मराठा

पेटवुन टाकिल आख्खा महाराष्ट्र मराठीच्या जयघोषानं... मी युवा महाराष्ट्राचा... माझी भाषा.....माझा अभिमान...

Thursday, November 6, 2014

फलोत्तमा द्राक्षा !

फलोत्तमा द्राक्षा !


द्राक्ष हे फळांमध्ये सर्वोत्तम आहे असे आयुर्वेद सांगतो ...

त्याची वैशिष्ट्ये पाहिली तर आजुच्या काळात द्राक्ष म्हणजे साक्षात् अमृत आहे हे आमच्या वाचकांच्या नक्कीच लक्षात येईल....

द्राक्षे ही आजकाल अनेक प्रकारची आढळतात ...
काळी आणि हलक्या हिरव्या रंगाची द्राक्षे बाजारात मिळतात ...
पण ही द्राक्षे मोठी आणि रसरशीत दिसावीत म्हणून त्याचा घड लहान असताना तो जीब्रेलिक अॅसिड मध्ये बुडवला जातो ....

अशी बुडवाबुडवी न केलेली लहान आकाराची द्राक्षे खायला उत्तम ...
ती तुलनात्मक दृष्ट्या चवीला सुद्धा जास्त गोड असतात ...
याच द्राक्षांचे वाळवून मनुके केले तर ते जास्त उत्तम असतात ....

आता द्राक्षाचे उपयोग पाहूया ....
१. शरीराला उपकारक आणि जीवन प्रदान करणारे सर्व गुण द्राक्षामध्ये आहेत ... वजन वाढत नसेल तर मुठभर मनुके रात्री कोमट भिजवून ठेऊन ते सकाळी खावेत ....

२. द्राक्षे जास्त प्रमाणात खाल्ली तर पोट व्यवस्थित साफ होते ...

३. सातत्याने तहान लागणे , अंगाचा दाह होणे , क्षयरोग , खोकला, दमा, लघवीला जळजळ होणे आणि शरी कृश असणे यात द्राक्षे उत्तम उपयोगी आहेत ...
वरील आजारात द्राक्षे खाण्यापेक्षा द्राक्षारीष्ट हे संधान केलेले औषध उत्तम उपयोगी आहे .

४. द्राक्षापासून काढलेले मद्य सर्व गुणांनी उत्तम असून त्याचा शरीरावर कोणताही दुष्परिणाम होत नाही ....

५. काळी द्राक्षे जेवढी रंगाला गडद तेवढी उत्तम ...

६. लैंगिक क्षमता कमी आली असेल तर रोज सकाळसहा तास दुधात भिजवलेले काळे मनुके खावेत ...

७. मनुक्यांचे नियमित सेवन तारुण्य टिकवून ठेवते ...

८. काळी द्राक्षे त्वचा आणि केस यांना खूप उपकारक असून केसांच्या तक्रारी मनुक्यांच्या सेवनाने कमी होतात ....

९. काळ्या मनुक्यात लोहाचे प्रमाण विपुल असते . त्यामुळे अनिमिया म्हणजेच शरीरात रक्ताची कमतरता असेल तरया मनुक्यांचा फायदा होतो . शरीराचा अशक्तपणा कमी होतो ...

१०. द्राक्ष हृदयास फायदेशीर असून , हृदयाच्या सातत्याने काम करणाऱ्या भीतीचे आयुष्य कैक पटीने वाढवून देतो ...नियमित द्राक्ष / मनुके सेवन करणाऱ्या व्यक्तीला हृदयाचे विकार होणायची शक्यता फार कमी असते ...
आधुनिक संशोधनात असे आढळून आले आही कि उच्च रक्तदाबाचा त्रास द्राक्षे नियमित सेवन करणाऱ्या व्यक्तींमध्ये आढळत नाही ....

११. नेत्राचे आरोग्य सुधारण्याची अदभूत क्षमता द्राक्षात आहे ....

असे हे अतिबहुगुणी फळ आपल्या भरतखंडात सर्वत्र सापडते ही ईश्वराची कृपाच म्हणावी लागेल ....

No comments: