त्वचेची रचना व कार्य
या बाह्यत्वचेच्या पेशीथरांमध्ये मेलॅनिन नावाचे रंगद्रव्य असते. या मेलॅनिनचे प्रमाण हे आनुवंशिकता, वातावरण, स्त्री-पुरुषभेद, वय, इत्यादी विविध गोष्टींवर अवलंबून असते. या रंगद्रव्याच्या प्रमाणावरूनच त्वचेचा काळे-गोरेपणा ठरतो. त्वचेचा रंग आणखी दोन रंगद्रव्यांमुळे येतो. (अ) त्वचेखालच्या चरबीतले पिवळे द्रव्य-कॅरोटिन आणि (ब) त्वचेच्या रक्तप्रवाहातील रक्तद्रव्य-हिमोग्लोबीन ही ती दोन रंगद्रव्ये आहेत.
त्वचेतील ग्रंथीतून तेलकट पदार्थ पाझरतो. हा पदार्थ त्वचेच्या आरोग्यासाठी आवश्यक असतो. साबणाच्या वापराने हा तेलकट थर निघून जातो. यामुळे त्वचा खरखरीत बनते. आरोग्यासाठी साबणाचा वापर आवश्यक नाही,उलट तो हानिकारक ठरू शकतो. अगदी तेलाशीच रोज काम असेल किंवा अंग फारच मळकट झाले असेल तर साबण वापरणे गरजेचे आहे. इथेही साबणाच्या ऐवजी बेसन, शिकेकाई, रिठे,इत्यादी पदार्थ वापरता येतात. (साबणाचा वापर वाढत चालल्याने जलप्रदूषण वाढत आहे हे लक्षात ठेवून वापर कमी करावा लागेल.) |
No comments:
Post a Comment