स्वराज्य रक्षणा उभा ठाकतो शिवबाचा मावळा..!!
रणशिंग फुंकले स्वातंञ्याचे
तलवार मुठी आवळा,
स्वराज्य रक्षणा उभा ठाकतो
शिवबाचा मावळा..!!
गुलामीतुनी मुक्त व्हावया
करीती गडकिल्ले कळवळा,
स्वराज्य तोरण चढविण्या धावतो
शिवबाचा मावळा..!!
रणभुमीवर आग फेकितो
जणु तोफेचा गोळा,
धडकी भरवितो मृत्युलाही
शिवबाचा मावळा..!!
"हर हर महादेव" रणी गर्जणा
रक्त करी सळसळा,
मराठ्यांचा वाघ शोभतो
शिवबाचा मावळा..!!
मराठी मातीत जंन्म घेतला
अभिमान उरी आगळा,
शिवचरणांवर निष्ठा अर्पितो
शिवबाचा मावळा..!!
शिवबाचा मावळा..!!
।।जय जिजाऊ।। ।।जय शिवराय।।
:- विशाल धुमाळ
No comments:
Post a Comment