मी मराठा

पेटवुन टाकिल आख्खा महाराष्ट्र मराठीच्या जयघोषानं... मी युवा महाराष्ट्राचा... माझी भाषा.....माझा अभिमान...

Saturday, July 2, 2011

तुझी साथ हवी होती मला आयुष्यात..............

तुझी साथ हवी होती मला आयुष्यात
खूप स्वप्न पहिली त्यासाठी
पण डोळे उघडले आणि स्वप्ने तुटली
नेहमी असेच का होते
स्वप्न हे स्वप्नच बनून का राहते

स्वप्नांना सत्याची जोड का नसते
जे काही असते ते सगळे खोटे असते
कारण स्वप्न हे स्वप्न असते
त्यात काही सत्य नसते

प्रेम माझे खरे होते तुझ्यावर
पण नाही सांगू शकली कधी तुला
कारण तेव्हा मी स्वप्नांच्या दुनियेत
तुझ्याबरोबर रमत होती

आज त्या गोष्टीला खूप उशीर झाला आहे
हातातून सगळ्या गोष्टी निसटून गेल्या आहेत
तरीही मी अजून स्वप्नांच्याच दुनियेत आहे
कारण जे सुख सत्यात नाही
ते स्वप्नात आहे

No comments: