मी मराठा

पेटवुन टाकिल आख्खा महाराष्ट्र मराठीच्या जयघोषानं... मी युवा महाराष्ट्राचा... माझी भाषा.....माझा अभिमान...

Saturday, February 5, 2011

प्रेम....

प्रेम....
शब्दांनी सांगायचं नसतं प्रेम....
ते डोळ्यांनी साधायचं असतं,
आपलं कुणी झालं नाही तरी..
आपण कुणाचतरी व्हायचं असतं....

खरचं प्रेमाचा अर्थ इतका व्यापक आहे?
प्रकाशासाठी स्वतः जळणारा तो दिपक आहे..
कोवळ्या इंद्रधनूसारखी मनाचा ठाव घेणारी,
प्रेमाची ही कल्पनाचं किती कल्पक आहे....


अर्थहीन जीवनाला नवा अर्थ म्हणजे प्रेम
तहानलेल्या भूमीला पावसाचा स्पर्श म्हणजे प्रेम..
अमावस्येच्या अंधाराची समिक्षा घेत,
निखळ चंद्राची प्रतिक्षा म्हणजे प्रेम....

म्हणूनच............
जीवनात हवा असतो कुनाचातरी सहवास,
गर्द माळरानातल्या एकट्या गुलाबाची आस...
विरहाचे दुःख डोळ्यात लपवूनही,
भिजलेले डोळे करतात मन उदास....................

No comments: