मी मराठा

पेटवुन टाकिल आख्खा महाराष्ट्र मराठीच्या जयघोषानं... मी युवा महाराष्ट्राचा... माझी भाषा.....माझा अभिमान...

Saturday, February 5, 2011

पक्के सदाशिव पेठी शब्द...........

पक्के सदाशिव पेठी शब्द

केशव- साधा सरळ माणुस, नाका समोर बघून चालणारा.

खडकी- एकदम टुकार.

कातील / झक्कास /अल्टी - एकदम चांगले.

काशी होणे- गोची होणे.

लई वेळा- नक्की, खात्रीने.

चल हवा येवू दे- निघून जा.

मस्त रे कांबळे- छान, शाब्बास.

पडीक- बेकार.

मंदार- मंद बुध्दीचा.

चालू- शहाणा.

पोपट होणे- फजिती होणे.

दत्तू.- एखाद्याचा हुज~या.

बॅटरी- चश्मेवाला / चश्मेवाली.

पुडी- माणिकचंद व दुसरा गुटखा.

राष्ट्रगीत वाजणे- संपणे / बंद पडणे.

पुडी सोडणे- थाप मारणे.

खंबा- दारुची / बीयरची बाटली.

पावट्या- एकदम मुर्ख.

खडकी दापोडी- हलक्या प्रतीचे.

टिणपाट- काहीच कामाचा नसलेला.

पेताड / बेवडा- खुप दारु पिणारा.

डोलकर- दारु पिवून झिंगणारा.

सावरकर- दारु पिवून झिंगणा-याला सावरणारा.

वखार युनूस- दारु पिवून ओकारी करणारा.

सोपान- गांवढंळ माणुस.

सांडणे-- पडणे.

पाट्या टाकणे- रोज तेच तेच काम करुन वेळ घालवणे.

भागवत- दुस-याच्या जिवावर जगणारा.

पत्ता कट होणे- शर्यतीतुन बाहेर होणे.

फणस लावणे- नाही त्या शंका काढणे.

फिरंगी- कोकाटे इंग्लीश फाडणारा.

पेटला- रागावला.

बसायचे का?- दारु प्यायची का?

चड्डी- एखाद्याच्या खुप जवळचा.

No comments: