लटकणारा चेहरा आणी कपाळावर आठी,
गर्वसे कहो,We Are मराठी,
आमची मुंबई,मराठी मुंबई,
अशी घोषणा देऊन फसलो,
नि आमची मुंबई,
भलत्याच्याच हातात देऊन बसलो………
गल्ल्यावरचा मद्रासी अण्णा,
गालातल्या गालात हसतो,
नि मराठी माणूस,
टेबलावरती फडके मारत बसतो………..
आमच्या प्रांतात आम्हीच उपरे,
नाही आधार कुणाचा पाठी,
गर्वसे कहो,We Are मराठी,
मराठी माणूस देवाला भितो, कर्जाला भितो,
एवढा दोघांनाही भित नाही,
तेवढे इंग्रजीला भितो…………….
कुणी 'अरे' म्हटलेकी की तोंडातून 'कारे' निघून जाते,
पण कुणी BASTARD म्हटलं,
की सगळी हवाच निघून जाते……………
मराठी भाषेला जाऊन एकदा प्रश्न केला,
मुंबईतून गेलीस तशी महाराष्ट्रातून जावे,
असा विचार मनात नाही आला
त्यावर ती म्हणाली,
काल होती बहिणाबाई आणी मुक्ताबाई,
आज असे कुसूमाग्रज आणी पुं.लं. माझ्या वारी,
थांबले त्यांच्याचसाठी,
गर्वसे कहो,We Are मराठी…………….
बोलता बोलता अचानक उठली अन् म्हणाली,
छंद झाला, हौस झाली, कवीता झाली,
पण पुरत नाही ती पोटासाठी,
आता निघाले जरा खळगी भरण्यासाठी,
गर्वसे कहो,We Are मराठी
Friday, January 14, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment